शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या वडिलांनी मागितलं फ्रान्सचं नागरिकत्व; सांगितलं 'हे' कारण

By जयदीप दाभोळकर | Updated: January 1, 2021 12:42 IST

Boris Johnson : बोरिस जॉन्सन यांचे वडिल स्टॅनले यांनी दिलेल्या एका मुलाखतीत आपल्याला फ्रान्सचं नागरिकत्व हवं असल्याचं म्हटलं. तसंच यामागे कोणतं कारण आहे याबाबतही त्यांनी माहिती दिली.

ठळक मुद्देएका रेडियो चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी फ्रान्सच्या नागरिकतेवर भाष्य केलं.यापूर्वी बोरिस जॉन्सन यांच्या बहिणीनंदेखील वडिलांना फ्रान्सचं नागरिकत्व मिळाल्यास आपल्यालाही नागरिकत्व घेण्यास आवडेल असं म्हटलं होतं.

ब्रिटननं काही महिन्यांपूर्वी युरोपिय महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आता ब्रक्झिटची ही प्रक्रिया जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. अशातच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या वडिलांनी फ्रान्सचं नागरिकत्व मागितल्याची माहिती समोर आली. बोरिस जॉन्सन यांचे वडिल स्टॅनले जॉन्सन यांनी गुरूवारी या वृत्ताला दुजोरा दिला.स्टॅनले जॉन्सन यांनी आरटीएल रेडियोशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी आपल्याला फ्रान्सचं नागरिकत्व हवं असल्याचं वक्तव्य केलं. "जर खरं सांगायचं झालं तर मी फ्रान्सचाच आहे. माझ्या आईचा जन्म फ्रान्समध्ये झाला होता. त्यांची आईदेखील फ्रान्सची होती आणि त्यांचे वडिलदेखील फ्रान्सचेच नागरिक होते," असं स्टॅनले जॉन्सन आरटीएल रेडियोशी बोलताना म्हणाले. "माझ्या समोर हा प्रश्न आहे की माझ्याकडे पहिल्यापासून काय आहे आणि मी याबाबत अतिशय खुश आहे," असंही ते म्हणाले. "मी कायमच युरोपियन राहणार आहे. युरोप एका मार्केटपेक्षाही मोठं आहे. ते युरोपियन महासंघापेक्षाही मोठं आहे. युरोपियन महासंघासोबत एकत्रित असणं महत्त्वपूर्ण आहे," असंही स्टॅनले म्हणाले. तसंच यावेळी त्यांनी युरोपियन महासंघाच्या पासपोर्टचाही उल्लेख केला. यापूर्वी स्टॅनले जॉन्सन यांची कन्या आणि बोरिस जॉन्सन यांची बहिण रशेल यांनी मार्च महिन्यात एक पुस्तक प्रकाशित केलं होतं. या पुस्तकात त्यांनी आपल्या वडिलांना फ्रान्सचं नागरिकत्व हवं असल्याचा गौप्यस्फोट केला होता. तसंच त्यांना फ्रान्सचं नागरिकत्व मिळालं तर आपणदेखील फ्रेन्च बनू इच्छितो असंही त्या म्हणाल्या होत्या. 

टॅग्स :Englandइंग्लंडFranceफ्रान्स