अमेरिका- कोण कशातून पैसे कमावेल आणि कोणाला काय बघण्यात गोडी आहे हे सांगता येत नाही. कॅनडाची मॉडेल जेसिका गोल्डने (३२) आपल्या पायांची चित्रविचित्र छायाचित्रे इन्स्टाग्रामवर अपलोड करून वर्षाला ५५ हजार पौंडांची कमाई करीत असल्याचे सांगितले आहे. तिला तेथे दहा हजार फालोअर्सही लाभले आहेत. जेसिका तिच्या पायांची व बोटांची वेगवेगळी छायाचित्रे घेते. पायांच्या बोटांद्वारे दरमहा हजारो पौंडांच्या कमाईचा नवाच मार्ग दाखविला आहे.जेसिकाच्या वाचण्यात आकर्षक पायांची स्त्री मॉडेल्स हवी अशी जाहिरात आली होती. ‘मिस स्कार्लेट व्हिक्सेन’ या नावाने जेसिकाने तिच्या पायांच्या छायाचित्रांचा पहिला संच अपलोड करताच तिला पुरुषांकडून शेकडो संदेश (मेसेजेस) आले, हे पुरुष म्हणजेच ‘फूटबॉइज’ नावाने ओळखले जातात. पायांच्या असल्या प्रदर्शनातूनही कमाई होऊ शकते व आता हेच मी उदरनिर्वाहाचे साधन बनविले आहे, असे आँटारियोत राहणा-या जेसिकाने सांगितले. माझे पाय एवढे आकर्षक असू शकतात, असा विचारही मी कधी केला नव्हता, असे ती म्हणाली.
पायांची बोटेही देतात वर्षाला हजारो पौंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 05:10 IST