शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा शत्रू हाफीज सईदवर अमेरिकेने आणले निर्बंध

By admin | Updated: May 12, 2017 18:20 IST

दहशतवादी संघटनांना मिळणारा पैसा बंद व्हावा यासाठी अमेरिकेने पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांवर निर्बंध आणले आहेत.

 ऑनलाइन लोकमत

वॉशिंग्टन, दि. 12 - दहशतवादी संघटनांना मिळणारा पैसा बंद व्हावा यासाठी अमेरिकेने पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांवर निर्बंध आणले आहेत. यामध्ये  हाफीज सईदची लष्कर-ए-तोएबा आणि जमात उद दावा या संघटनांचा समावेश आहे. लष्कर-ए-तोएबाने  मुंबई 26/11 हल्ल्यासह भारतात अनेक दहशतवादी कारवाया केल्या आहेत. जमता उद दावाच्याआडून हाफीजने समाजसेवकाचा मुखवटा धारण केला आहे.
 
 या संघटनांचे पैसे उभारण्याचे नेटवर्क मोडून काढण्याच्या उद्देशाने अमेरिकेने हे निर्बंध आणले आहेत. इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया, आयएसआयएस खोरसाना या संघटनांचाही निर्बंधांमध्ये समावेश आहे. 
 
पाकिस्तानातून तालिबान, अलकायदा, आयएसआयएस आणि लष्कर-ए-तोएबा या संघटनांना भरती आणि आत्मघातकी हल्ल्यांसाठी जी रसद मिळतो ती तोडण्यासाठी अमेरिकेने हे निर्बंध घातले आहेत अशी माहिती परदेशी संपत्ती नियंत्रण विभागाचे संचालक जॉन स्मिथ यांनी दिली. पाकिस्तानातील कट्टरपंथीयांविरोधात अमेरिका आपली मोहिम सुरु ठेवणार आहे. समाजसेवेच्याआडून या संघटना दहशतवादासाठी पैसा गोळा करतात असे स्मिथ म्हणाले. 
 
दरम्यान अमेरिकेच्या दबावामुळे पाकिस्तानने सईदवर काही प्रमाणात नियंत्रण आणले आहे. मागच्या महिन्यात  हाफिज सईद हा दहशतवादी असल्याचे स्वत: पाकिस्ताननेच मान्य केले आहे. पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने लाहोर उच्च न्यायालयामध्ये यासंबंधीचे प्रतिज्ञापत्र सादर केले. हाफिजचा दहशतवाद आणि दहशवादी कारवायांशी संबंध असल्याचे पाकच्या गृह मंत्रालयाने या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
 
मध्यंतरी पाकिस्तानने त्या देशातील अनेकांची सुरक्षा व्यवस्था कमी केली होती. त्यात हाफिजचाही समावेश होता. सुरक्षा कमी केल्यावर त्याला लगेचच नजरकैदेत ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला. सुरक्षित ठेवण्यासाठीच त्याला नजरकैदेत ठेवल्याची टीकाही अनेकांनी पाक सरकारवर केली होती. अमेरिकेने हाफिजचा मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीत समावेश केला आहे. शिवाय त्याच्या अटकेसाठी मदत करणाऱ्या व्यक्तीला एक कोटी डॉलरचे बक्षीस देण्याचेही जाहीर केलेले आहे.