शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेच्या सी1/डी क्रू व्हिसाचा योग्य वापर कसा करता येईल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 16:46 IST

पहिल्यांदाच प्रवास करणारे बहुतांश जण अमेरिकेच्या एमिग्रेशन कायद्यांबद्दल आणि त्याच्या उल्लंघनानंतर होणाऱ्या परिणामांबद्दल अनभिज्ञ असतात.  अमेरिकेच्या सागरी हद्दीत किंवा अमेरिकेच्या बंदरांवर असताना तुम्ही सी१/डी स्टेटसची काळजी घ्यायला हवी.

प्रश्न: माझ्याकडे सी1/डी क्रू व्हिसा आहे. मी त्याचा योग्य वापर कसा करू शकतो?उत्तर: अमेरिकेला प्रवास करताना तुम्ही तुमचा वैध पासपोर्ट आणि सी१/डी व्हिसा सोबत ठेवायला हवा. तुम्हाला नोकरी देणाऱ्या व्यक्तीनं दिलेल्या पत्रातील ठिकाणीच तुम्ही नोकरी करायला हवी आणि अमेरिकेच्या कस्टम आणि सीमा सुरक्षानं काही कागदपत्रं मागितल्यास त्यांची पूर्तता करायला हवी. सी१/डी व्हिसाच्या आधारे जहाजावर काम करताना तुमच्याकडे वैध एम्प्लॉयमेंट ऑफर असायला हवी. कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला नोकरीचं बोगस नियुक्तीपत्र अथवा अन्य कोणतीही बोगस कागदपत्रं दाखवल्यास व्हिसा रद्द केला जाऊ शकतो आणि/किंवा व्हिसासाठी अपात्र ठरवलं जाऊ शकतं. अशा व्यक्तींना अमेरिकेत कधीही प्रवेश दिला जात नाही. खबरदारीचा उपाय म्हणून प्रवास सी१/डी व्हिसावर प्रवास सुरू करण्याआधी भारताच्या शिपिंग महासंचालकांचं संकेतस्थळ तपासा. तुम्हाला नियुक्तीपत्र जारी करणारी शिपिंग कंपनी किंवा मॅनिंग एजन्सी नोंदणीकृत आहे ना, तिच्याकडे वैध आरपीएसएल (रजिस्ट्रेशन अँड प्लेसमेंट सर्विसेस लायसन्स) आहे ना, याची खातरजमा करा. तुम्ही या संकेतस्थळावर जाऊन माहिती पडताळून पाहू शकता. http://www.dgshipping.gov.in/Content/RPSAgencies.aspx

पहिल्यांदाच प्रवास करणारे बहुतांश जण अमेरिकेच्या एमिग्रेशन कायद्यांबद्दल आणि त्याच्या उल्लंघनानंतर होणाऱ्या परिणामांबद्दल अनभिज्ञ असतात.  अमेरिकेच्या सागरी हद्दीत किंवा अमेरिकेच्या बंदरांवर असताना तुम्ही सी१/डी स्टेटसची काळजी घ्यायला हवी. जर तुम्हाला किनाऱ्याहून सुट्टी घ्यायची असल्यास तुमचं वास्तव्य असलेल्या बंदराच्या हद्दीच्या बाहेरील डॉक्टरकडे जा किंवा दुसऱ्या क्रूमध्ये सहभागी व्हा. तुमच्याकडे असलेला सी१/डी व्हिसा वैध असायला हवा. अन्यथा तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. सी१/डी व्हिसावर अमेरिकेत प्रवेश केल्यानंतर तुम्हाला जमिनीवर काम करता येणार नाही. तुमची नियुक्ती करणाऱ्या कंपनीला जमिनीवर काम करण्याची परवानगी असली तरीही तुम्हाला ते काम करता येणार नाही. तुम्हाला लायटरिंगशी संबंधित कामं करायची असल्यास किंवा परदेशी मालकीच्या जहाजांवर काम करायचं असल्यास हाच नियम लागू आहे. 

सी१/डी स्टेटस मेंटेन करण्याचा अर्थ तुम्ही अमेरिकेत आल्याच्या २९ दिवसांत पुन्हा माघरी जाणं असा होतो. तुम्ही तुमच्या शिपवर जाण्यात अपयशी ठरल्यास किंवा दिलेल्या वेळेत अमेरिका सोडून न गेल्यास तुम्हाला त्याचे परिणाम सहन करावे लागू शकतात. तुमचा व्हिसा रद्द केला जाऊ शकतो किंवा त्याचं नुतनीकरण नाकारलं जाऊ शकतं. तुमच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल होऊ शकते. भारताचे शिपिंग महासंचालक तुमचं सीडीसी रद्द करू शकतात. तुमचा पासपोर्ट रद्द करण्याची शिफारस ते परराष्ट्र मंत्रालयाकडे करू शकतात किंवा नाविक म्हणून भारतीय ई-गव्हर्नन्स आणि ई-मायग्रेट यंत्रणेकडून तुम्हाला मिळणारे सर्व विशेषाधिकार काढून घेतले जाऊ शकतात.

अमेरिकेला जात असताना सी१/डी व्हिसाशी संबंधित नियम समजून घ्यावेत यासाठी आम्ही नाविकांना प्रोत्साहन देतो. या लेखामुळे तुम्हाला अतिरिक्त मदत मिळाली असेल अशी आम्हाला आशा आहे. तुमच्याकडे असलेल्या सी१/डी व्हिसाच्या वैधतेबद्दल तुमच्या मनात काही प्रश्न असल्यास तुम्ही तुमच्या मॅनिंग एजन्सीशी बोलू शकता. अधिक माहितीसाठी www.ustraveldocs.com/in या संकेतस्थळावर जा किंवा (91-120) 484-4644, (91-22) 6201-1000 या कॉल सेंटरच्या नंबरवर किंवा अमेरिकेहून 1-703-520-2239 या नंबरवर संपर्क करू शकता. तुम्ही support-india@ustraveldocs.com वर ईमेलदेखील करू शकता.महत्त्वाची सूचना: व्हिसा आणि दूतावासाशी संबंधित पडलेल्या तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळण्याचं योग्य  ठिकाण म्हणजे http://www.ustraveldocs.com/in या कॉलममधून आम्ही विशिष्ट व्हिसा प्रकरणांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देत नाही. व्हिसासंबंधित सामान्य प्रश्नांची उत्तरं आम्ही देतो. तुम्हाला विशिष्ट व्हिसाबद्दल प्रश्न विचारायचे असल्यास, support-india@ustraveldocs.com वर संपर्क साधा. अमेरिकन व्हिसाचे सर्व अर्जदार अर्जाचा आयडी आणि क्रमांकासह त्यांनी अर्ज केलेल्या व्हिसाचं स्टेटस http://ceac.state.gov/ceacवर जाऊन तपासू शकता. फेसबुकवर आमचं www.facebook.com/Mumbai.USConsulate पेज लाईक करा. तर ट्विटरसाठी http://twitter.com/USAndMumbai क्लिक करून आम्हाला फॉलो करा.

टॅग्स :AmericaअमेरिकाVisaव्हिसा