शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नेदरलँडने पुराच्या तडाख्यापासून शहरांचे कसे रक्षण केले ?

By अोंकार करंबेळकर | Updated: August 31, 2017 13:02 IST

समुद्राचे पाणी शहरात भरून नुकसान होण्याचा सर्वात मोठा धोका नेदरलँडला आहे. तरिही या देशाने आपल्या राजधानी अँमस्टरडँमसह इतर शहरांना गेली अनेक शतके पाण्यापासून सुरक्षित ठेवले आहे.

ठळक मुद्देसमुद्राचे पाणी शहरात भरून नुकसान होण्याचा सर्वात मोठा धोका नेदरलँडला आहे. तरिही या देशाने आपल्या राजधानी अँमस्टरडँमसह इतर शहरांना गेली अनेक शतके पाण्यापासून सुरक्षित ठेवले आहे.नेदरलँड हा देश चक्क समुद्रसपाटीच्या पातळीपासून खाली आहे. यदेशाचा दोन तृतियांश प्रदेशाची उंची समुद्रसपाटीपासून केवळ तीन फुट किंवा त्याहीपेक्षा कमी आहे.

मुंबई, दि. ३१- २६ जुलै २००५ चा पूर असो वा २९ आँगस्ट २०१७, मुंबई खाडी बुजवून तयार केलेल्या जमिनीवर बांधली आहे, जवळच समुद्र आहे, पाऊसही भरपूर पडतो अशी कारणं देऊन मुंबईत साचणाऱ्या पावसाचं समर्थन केलं जातं. परंतु ही कारण पुरेसे नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न केल्यामुळे पुढे करावी लागत आहेत. समुद्राचे पाणी आत शिरण्याचा धोका जगातील अनेक शहरांना आहे न्यूयाँर्क, व्हेनिस ही शहरेद्धा पाण्याच्या काठावरच आहेत. पण समुद्राचे पाणी शहरात भरून नुकसान होण्याचा सर्वात मोठा धोका नेदरलँडला आहे. तरिही या देशाने आपल्या राजधानी अँमस्टरडँमसह इतर शहरांना गेली अनेक शतके पाण्यापासून सुरक्षित ठेवले आहे. 

नेदरलँड हा देश चक्क समुद्रसपाटीच्या पातळीपासून खाली आहे. या देशाचा दोन तृतियांश प्रदेशाची उंची समुद्रसपाटीपासून केवळ तीन फुट किंवा त्याहीपेक्षा कमी आहे. अँमस्टरडँम, राँटरडँम आणि हेग या तिन्ही महत्त्वाच्या शहरांमध्ये पाणी भरण्याता सतत धोका असतो. समुद्रसपाटीपासून जमिन खाली असल्यामुळे नेदरलँडमध्ये गेली हजारो वर्षे पूर येत असल्याचा इतिहास असून तितकीच वर्षे ते पाण्याशी झगडत आहेत. समुद्राचे पाणी आत येऊ नये यासाठी त्यांनी डाइक म्हणजे रुंद बांध बांधायला सुरुवात केली. १९१६ साली झोडोर्झे शहरात आलेल्या पुरामुळे डच लोकांनी एक मोठा डाइक बांधून पाणी अडवले. या बांधावरुन रस्ताही जातो व त्याने अडवलेल्या पाण्यामुळे मोठा जलाशयही तयार झाला आहे. १९३२ साली हा डाइक बांधून तयार झाला. काही डच तज्ज्ञांनी व नाँर्वेजियन कंपन्यांनी मुंबईचा कोस्टल रोडही असाच किनार्यापासून पाचशे मीटर पाण्यात डाइकवर बांधावा अशी सूचना केली होती. हा डाईक पूर्ण बांधावा लागणार नाही, त्यासाठी काही नैसर्गिक खडकरचनेचाही आधार म्हणून वापर होईल तसेच किनारा व डाइक यामधील जागेचा वापर होल्डींग पाँडसारखा वापर होईल त्यात पुराचे पाणी वाहून जाता येईल व शहराला धोका पोहोचणार नाही. 

डचांना समुद्राच्या पाण्याबरोबर समुद्राला वाहात जाऊन मिळणाऱ्या नद्यांपासूनही धोका आहे. त्यामुळे नदी पात्राजवळ रुम आँफ वाँटर म्हणजेच थोडी मोकळी जागा सोडण्यात आली. नदीला वळणे जास्त असली की तिचा वेग कमी होतो म्हणून तशीही योजना करण्यात आली. तसेच नदीच्या गाळाच्या मैदानाची खोली वाढवण्यात आली. गाळाची मैदाने उथळ व सपाट असल्यामुळे तेथे पाणी साठण्याचा धोका जास्त असतो, त्यांची खोली वाढवून तो धोका कमी केला गेला. नदीला मिळणाऱ्या लहान प्रवाहांचे व उपनद्यांची खोलीही वाढवून पाणी जास्तीत जास्त पात्रात राहावे, ते बाहेर येऊ नये अशी योजना केली गेली. याबरोबरच मेस्लांटकेरिंग नावाचे लोखंडी गेटही बांधून समुद्राचे पाणी शहरांमध्ये घुसू नये अशी व्यवस्था केली गेली. 

डचांसाठी पाणी भरणे हे नेहमीचे व प्राचिन  संकट असल्यामुळे डाइक बांधायला ११ व्या शतकातच सुरुवात झाली होती. तसेच जमिन कोरडी राहावी म्हणून पाणी उपसण्यासाठी पवनचक्कीचा वापर केला जाऊ लागला. सर्वात पहिली पवनचक्की १५ व्या शतकात बांधली गेली. आज या पवनचक्क्या ऐतिहासिक सहलींची ठिकाणे म्हणून ओळखली जातात. नेदरलँडने किनाऱ्याची होणारी सततची धूप ओळखून वाळूचे पुन्हा संचयन व्हावे यासाठू कृत्रिमरित्या वाळू किनाऱ्याजवळ टाकायला सुरुवात केली. यामुळे किनार्याची होणारी धूप कमी झाली व सतत हे संचयन केल्यामुळे हानी टळली. 

उत्तम सतर्क योजनानेदरलँडने स्टाँर्म सर्ज वाँर्निंग सर्विस नावाने एक सेवा सुरु केली आहे. यात पुराची सूचना , तीव्रता आधीच समजत असल्याने लोकांना तशा सूचना देऊन सुरक्षित जागी हलवण्यात येते. किनारा व डाइकच्या जवळ राहणारे लोक आधी सुरक्षित ठिकाणी नेले जातात. नेदरलँडने नदी जवळचे काही प्रदेश संभाव्य पुराच्या जागा म्हणून रिकाम्या केल्या आहेत. पुराच्या वेळेस पाणी या प्रदेशात पाणी साठावे आणि इतर भागात पसरू नये असा त्यामागचा हेतू आहे.