मोगादिशू : सोमालियाची राजधानी मोगादिशू येथील उपाहारगृहावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २० जण ठार झाले. सुरक्षा दलांनी कारवाई करीत उपाहारगृहात अडकून पडलेल्यांची शुक्रवारी सुटका केली. हे उपाहारगृह समुद्रकिनारी आहे. अल-शबाबच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. लष्कराने उपाहारगृहावर सकाळी नियंत्रण मिळविले, असे कॅ. मोहंमद हुसैन यांनी सांगितले. हल्ल्यात २० जण ठार झाल्याचे ते म्हणाले. तथापि, अतिरेक्यांचा त्यात समावेश आहे किंवा नाही हे स्पष्ट होऊ शकले नाही. उपाहारगृहामध्ये पार्टी सुरू असताना हल्ला झाला. त्यामुळे तेथील एका हॉलमध्ये अनेक जण रात्रभर अडकून पडले होते. (वृत्तसंस्था)
सोमालियात हॉटेलवर हल्ला
By admin | Updated: January 23, 2016 03:27 IST