शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

समलिंगी दाम्पत्यास भाडोत्री मातृत्वाने तिळे!

By admin | Updated: August 23, 2016 05:15 IST

क्रिस्टो आणि थिओ मेनेलाओऊ या दक्षिण आफ्रिकेतील एका समलिंगी पुरुष दाम्पत्यास भाडोत्री मातृत्त्वाने तिळी अपत्ये झाली

प्रिटोरिया (द. आफ्रिका) : क्रिस्टो आणि थिओ मेनेलाओऊ या दक्षिण आफ्रिकेतील एका समलिंगी पुरुष दाम्पत्यास भाडोत्री मातृत्त्वाने तिळी अपत्ये झाली आहेत. यापैकी एक मुलगा आहे व दोन हुबेहूब दिसणाऱ्या जुळ््या मुली आहेत. भाडोत्री मातृत्वाने अशा प्रकारे दोन जुळ््यांसह तिळे जन्माला येण्याची जगातील ही बहुधा पहिलीच घटना असावी, असे मानले जात आहे.अणखी विशेष असे की, भाडोत्री मातेच्या गर्भधारणेसाठी क्रिस्टो आणि थिओ या दोघांच्याही ‘डीएनए’चा उपयोग केल्याने जन्माला आलेल्या या तिन्ही मुलांना या दोघांचे दुहेरी जैविक पितृत्व लाभले आहे.भाडोत्री मातेने ३१ आठवड्यांच्या गरोदरपणानंतर येथील सनिंगहिल इस्पितळात या अपुऱ्या दिवसांच्या तीन बाळांना सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर जन्म दिला. २ जुलैला जन्म झाल्यापासून या तिन्ही बाळांचे जन्ममृत्यूच्या हिंदोळयांवर हेलकावे खाणे सुरु होते. परंतु चार आठवड्यांच्या शुश्रुषेनंतर ती तिघेही जगतील याची खात्री पटल्यावर डॉक्टरांनी त्यांच्या जन्माची माहिती आता जाहीर केली आहे. क्रिस्टो अणि थिओ या तिन्ही बाळांना घेऊन प्रिटोरियामधील आपल्या घरी परतले आहेत. या तिळ््यांमधील मुलाचे नाव त्यांनी जोशुआ असे ठेवले आहे तर दोन जुळ््या मुलींचे झो व केट असे नामकरण करण्यात आले आहे.जोशुआ सर्वप्रथम जन्मला व जन्माच्या वेळी त्याचे वजन १.८२ किलो (४ पौंड) होते. त्यानंतर झो (१.४ किलो/३.१ पौंड) व केट (१.३ किलो/ २.९ पौंड) या दोन मुलींचा त्याच क्रमाने जन्म झाला. जन्माच्या वेळी ही मुले एवढी नाजूक व कमी वजनाची होती की सर्जन, नर्स आणि भूलतज्ज्ञांची मिळून २०हून अधिक जणांची टीम त्यांच्यावर सतत देखरेख करीत होती. त्यांची फुफ्फुसे एवढी नाजूक होती की त्यांना श्वासोश्वासाठी यंत्रे लावावी लागली. शिवाय झोच्या हृदयात व्यंग असल्याने ते दूर करण्यासाठी तिच्यावर शस्त्रक्रियाही करावी लागली. थिओ तीन आठवडे या तिन्ही अपत्यांसोबत त्यांच्याच पलंगावर इस्पितळात झोपत असे. (वृत्तसंस्था)>आपल्यालाही मूल व्हावे अशी इच्छा असली तरी समलिंगी वैवाहिक संबंधांतून ते शक्य नाही, याची खंत प्र्रत्येक समलिंगीच्या मनात सतत असते. तशी ती आम्हालाही होती. बरं मूल दत्तक घ्यावे म्हटले तर तेथे विषयलिंग दाम्पत्यांना प्राधान्य दिले जाते व आमचा नंबर लागलाच तर तो अगदी शेवटी लागणार, याचीही जाणीव झाली. सरोगसीचा एक आशेचा किरण दिसत होता. आमच्या मुलांना जन्माला घालणारी भाडोत्री आई आम्हाला मिळाली. हे सर्वच अघटित, अविश्वसनीय आहे. -क्रिस्टो मेनेलाओऊ, तिळ््या मुलांचा पिता