शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

दुसऱ्या फेरीनंतरही हिलरींची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2016 04:47 IST

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीच्या प्रचाराची पातळी यंदा खूपच खालावली असून, वैयक्तिक आरोप, एकमेकांची

वॉशिंग्टन : अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीच्या प्रचाराची पातळी यंदा खूपच खालावली असून, वैयक्तिक आरोप, एकमेकांची बदनाम, आर्थिक गैरव्यवहाराचे मुद्दे आणि खासगी आयुष्यातील कुलंगडी यावरच अधिक चर्चा होताना दिसत आहे. सेंट लुईसमध्ये झालेल्या दुसऱ्या प्रेसिडेन्शिअल डिबेटमध्येही हेच विषय प्रामुख्याने चर्चिले गेले. मात्र पहिल्या डिबेटप्रमाणेच दुसऱ्या डिबेटनंतरही डेमॉक्रेटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांचा विजयच निश्चित असल्याचे मानले जात आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्सप यांनी बेछुट विधाने आणि अल्पसंख्य समाजाविषयीची वक्तव्ये अमेरिकन मतदारांना भावली नसल्याचे दोन्हींही चर्चांतून उघड झाले आहे.सोमवारी झालेल्या चर्चेत डोनाल्ड ट्र्म्प यांनी कोणत्याही शरणार्थींना अमेरिकेत घुसू देणार नाही, चुंबनाविषयीचे वक्तव्ये मी खासगी गप्पांत केले होते, मी कोणत्याही महिलेचे तिच्या परवानगी चुंबन घेतलेले नाही वा तिला स्पर्श केलेला नाही. माझ्या मनात महिलांविषयी खूप आदर आहे, याउलट बिल क्लिंटन यांनी महिलांचे लैंगिन शोषण केले होते, माझ्या संपत्तीचे आॅडिट सुरू आहे, ते झाल्यावर मी टॅक्स रिटर्न्सची माहिती देईन, करचुकवेगिरीचे माझ्यावरील आरोप खोटे आहेत, रशियाबरोबर चांगले संबंध ठेवणे अमेरिकेसाठी फायद्याचे आहे, निवडणूक जिंकल्यास मी हिलरी क्लिंटन यांच्या ईमेल्सची चौकशी करून त्यांना तुरुंगात पाठवेन, इसिसला संपवून टाकेन, हिलरी यांच्या मनात माझ्याविषयी द्वेषाची भावना आहे, अशी विधाने करून श्रोत्यांची मते जिंकण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यांच्या वरवरच्या, भडक आणि आक्रस्ताळ्या भाषणाने आणि वादग्रस्त ठरलेल्या खासगी आयुष्यामुळे ३४ टक्के लोकांनीच त्यांच्या बाजूने कौल दिला.याउलट हिलरी क्लिंटन यांनी मी प्रत्येक अमेरिकन व्यक्तीबरोबर काम करेन, ज्याने मला मते दिली नाहीत, त्यांचेही प्रतिनिधीत्व करेन, ट्रम्प यांनी अमेरिकन शहिदाचा धर्माच्या नावावरून अपमान केला आहे, त्याबद्दल त्यांनी देशाची माफी मागायला हवी, ट्रम्प यांची धोरणे अमेरिकेला आर्थिक मंदीकडे नेतील, करचुकवेगिरी करणाऱ्या ट्रम्प यांनी आतापर्यंत टॅक्स रिटर्न्सची माहिती दिलेली नाही, असे नमूद करीत आणि शांत व संयमाने बोलत चर्चेमध्ये आघाडी घेतली. त्यामुळे ५७ टक्के लोकांनी राष्ट्राध्यक्षपदासाठी त्याच योग्य उमेदवार असल्याचे मत व्यक्त केले. याआधीच्या डिबेटमध्ये ६२ टक्के लोकांनी हिलरी क्लिंटन यांनाच कौल दिला होता. (वृत्तसंस्था)या चर्चेदरम्यान दोघांनी एकमेकांवर विविध विषयांवरून निशाणा साधत आरोप - प्रत्यारोप केले. तसेच राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यास आगामी योजनाही नमूद केले. चर्चेची तिसरी व अंतिम फेरी १८ आॅक्टोबर रोजी होणार असून, तिसरी मतदान ८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. मात्र, आपल्याच वक्तव्यांनी ट्रम्प सतत अडचणीत येत आहेत.त्यांचे समर्थन कसे करावे, असा प्रश्न त्यांच्या समर्थकांनाही पडला आहे. हिलरी क्लिंटन यांच्याविषयी अमेरिकन मतदारांमध्ये खूप चांगले मत नसले, तरी दोन्ही उमेदवारांमध्ये हिलरीच उत्तम आहेत, या निष्कर्षाप्रत तेथील लोक आले.