शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

महिना उलटला तरीही अपहृत मुली दहशतवाद्यांच्या कैदेत

By admin | Updated: May 15, 2014 03:21 IST

नायजेरियातील शाळकरी मुलींचे सामूहिक अपहरण होऊन आता महिना उलटला असून, बोको हराम दहशतवाद्यांनी अजूनही मुलींना आपल्या कैदेत ठेवले आहे.

अबुजा : नायजेरियातील शाळकरी मुलींचे सामूहिक अपहरण होऊन आता महिना उलटला असून, बोको हराम दहशतवाद्यांनी अजूनही मुलींना आपल्या कैदेत ठेवले आहे. नायजेरिया सरकार मुलींसाठी दहशतवाद्यांशी चर्चा करण्यास तयार आहे. नायजेरियाचे संसद सदस्य व अध्यक्ष गुडलक जोनाथन बोको हराम दहशतवाद्यांशी वाटाघाटी करण्यास तयार आहेत; पण गेल्यावर्षी ज्या राज्यात दहशतवाद्यांनी हिंसाचाराचा धुमाकूळ घातला तेथील आणीबाणी आणखी सहा महिने वाढवली जाणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून हिंसाचार व बॉम्बहल्ले करणार्‍या बोको हराम संघटनेने बोर्नो राज्यातील चिबॉक येथील शाळेतून १४ एप्रिल रोजी २७६ मुलींचे अपहरण केले आहे. नायजेरियाची आर्थिक राजधानी लागोस येथे मुलींच्या अपहरणाविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. तर २२३ मुलींच्या पालकांनी आमच्या मुली नक्की घरी कधी परतणार हे स्पष्ट करा अशी मागणी केली आहे. संयुक्त राष्टÑानेही मुलींच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. गेल्या सोमवारी बोको हरामने व्हिडिओ प्रसिद्ध करून १३० मुली दाखविल्या. (वृत्तसंस्था)