शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

'बर्म्युडा ट्रँगल'च्या रहस्यामागे षटकोनी ढग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2016 17:20 IST

'बर्म्युडा ट्रँगल'मध्ये विमान आणि जहाजे बेपत्ता होण्यामागे षटकोनी आकाराचे ढग असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 22 - संशोधकांना दशकांपासून न उलगडलेले अटलांटिक महासागरातील 'बर्म्युडा ट्रँगल'चे रहस्य अखेर समोर आले आहे.  आतापर्यंत बर्म्युडा ट्रँगलमुळे हजारो जणांचा बळी गेला आहे, 75 हून अधिक विमाने आणि 100 पेक्षा जास्त जहाजं बेपत्ता झाली आहेत. या परिसरात विमान आणि जहाजे बेपत्ता होण्यामागे 'षटकोनी आकाराचे ढग' असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. 'डेली मेल'ने यासंदर्भातील बातमी छापली आहे. 
 
संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार, ' षटकोनी आकाराचे ढग  (हेक्झागॉन क्लाउड) आणि सोबत वाहणा-या हवेमध्ये एखाद्या बॉम्ब किंवा स्पोटकाप्रमाणे शक्ती तयार होते. याचदरम्यान 170 मैल प्रति तास या वेगाने वारेही वाहतात.  हे ढग आणि हवा, विमान आणि जहाजांवर आदळल्यामुळे अपघात घडत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
 
याच कारणामुळे माणसांसहीत विमान आणि जहाजे बेपत्ता होत असावीत, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. 500,000 किलोमीटर चौरसपर्यंत पसरलेला या पट्टा गेली अनेक वर्षे कुप्रसिद्ध आहे. हवामानशास्त्रज्ञ  रेंडी सर्व्हनी यांच्यानुसार, हे षटकोनी आकाराचे ढग स्फोटाप्रमाणे परिस्थिती निर्माण करतात, ज्यामुळे आजूबाजूच्या सर्व गोष्टी उद्ध्वस्त होतात. वेगाने वाहणारे वारे ढगांना भेदत जाऊन समुद्रांच्या लाटांवर येऊन आदळतात, यामुळे त्सुनामीपेक्षाही उंच लाटा उसळतात. यातून विशिष्ट प्रकारची ऊर्जा निर्माण होते.
 
यादरम्यान आजूबाजूला असलेल्या गोष्टी उद्ध्वस्त होतात. संशोधकांनुसार, 'बर्म्युडा ट्रँगल बेटाच्या दक्षिणेकडे या षटकोनी आकाराच्या ढगांची निर्मिती होते, त्यानंतर जवळ-जवळ 20 ते 55 मैल प्रवास करुन ते ढग या रहस्यमय पट्ट्यात दाखल होतात'. गेल्या अनेक वर्षांपासून बर्म्युडा ट्रँगलबाबत अनेक चर्चा झाल्या, अनेक गोष्टी लिहिण्यात आल्या. मात्र बेपत्ता झालेली माणसे, जहाजे तसेच विमानांचे अवशेष अद्यापपर्यंत सापडलेले नाही.