शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

युद्धबंदी वाचविण्यासाठी मदत करा; युक्रेनची पुतीन यांना गळ

By admin | Updated: June 26, 2014 00:08 IST

युद्धबंदी पाळण्याचे आदेश दिले असतानाही एक लष्करी हेलिकॉप्टर पाडण्यात आल्याने युक्रेनच्या पाश्चात्त्य समर्थक नव्या नेतृत्वाने रशियन राष्ट्राध्यक्षांची तातडीने चर्चेची मागणी केली.

स्लाव्हयानस्क : रशिया समर्थक बंडखोरांच्या कमांडरने युद्धबंदी पाळण्याचे आदेश दिले असतानाही एक लष्करी हेलिकॉप्टर पाडण्यात आल्याने युक्रेनच्या पाश्चात्त्य समर्थक नव्या नेतृत्वाने रशियन राष्ट्राध्यक्षांची तातडीने चर्चेची मागणी केली. स्लाव्हयानस्क शहराजवळ युक्रेनियन लष्कराचे हेलिकॉप्टर पाडण्यात आल्यामुळे नऊ लष्करी कर्मचारी ठार झाले. याशिवाय सशस्त्र बंडखोरांच्या हल्ल्यात आणखी दोन सैनिकांचा बळी गेला. या रक्तपातानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को यांनी पूर्व भागात शक्तिशाली लष्करी मोहीम राबविण्याची धमकी दिली. सव्वा लाख लोकसंख्येचे स्लाव्हयानस्क हे शहर रशिया समर्थक बंडखोरांचा गड असून, या शहराला युक्रेनियन लष्कराने वेढा घातला आहे. बुधवारी सकाळी युक्रेन लष्कराने शहरावर पुन्हा तोफमारा सुरू केल्याचे पत्रकारांनी सांगितले.ही वादळापूर्वीची शांतता आहे. युद्धबंदी संपल्यानंतर हे वादळ पुन्हा घोंगावेल, असे एका बंडखोराने सांगितले. गेल्या ११ महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत ४३५ जणांचा बळी गेला आहे. पोरोशेन्को यांच्या प्रत्युत्तराच्या धमकीने हा संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी मध्यस्थी करणार्‍यांच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. युक्रेनने एकतर्फी युद्धबंदी लागू केली होती. बंडखोरांनी गेल्या सोमवारपासून युद्धबंदीचे पालन सुरू केले. युद्धबंदी शुक्रवारी सकाळी संपुष्टात येत आहे. युद्धबंदीच्या काळात मुत्सद्दी आघाडीवर आणखी एक निष्फळ अप्रत्यक्ष चर्चा सोडल्यास काहीही प्रगती होऊ शकलेली नाही. दरम्यान, रशियन राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी दोन्ही पक्षांना शांतता बाळगण्याचे आवाहन केले आहे.