शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

खुनाबद्दल राजपुत्राचा शिरच्छेद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2016 04:51 IST

सौदी अरबस्तानच्या राजघराण्यातील एक राजपुत्र तुर्की बिन सौद-अल-कबीर यांचा चार वर्षांपूर्वी केलेल्या खुनाची शिक्षा म्हणून मंगळवारी शिरच्छेद करण्यात आल्याचे सौदी सरकारने जाहीर केले.

रियाध : सौदी अरबस्तानच्या राजघराण्यातील एक राजपुत्र तुर्की बिन सौद-अल-कबीर यांचा चार वर्षांपूर्वी केलेल्या खुनाची शिक्षा म्हणून मंगळवारी शिरच्छेद करण्यात आल्याचे सौदी सरकारने जाहीर केले.सौदी सरकारच्या गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनाच्या हवाल्याने सरकारी वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले. तुर्की अल कबीर यांचे राजघराण्याशी नेमके काय नाते होते आणि त्यांना देहदंडाची शिक्षा नेमकी कशा प्रकारे दिली गेली, याचा तपशील सरकारने दिला नाही. डिसेंबर २०१२ मध्ये रियाधच्या बाहेर राजपुत्र कबीर व त्यांचे काही मित्र रात्रीच्या वेळी वाळवंटातील सफारीला गेले असता भांडणाच्या भरात कबीर यांनी त्यांच्यापैकी एकाला गोळी घालून ठार केले होते. नोव्हेंबर २०१४ मध्ये रियाध येथील न्यायालयाने कबीर यांना या खुनाबद्दल देहदंडाची शिक्षा सुनावली होती. त्या शिक्षेची अंमलबजावणी आता करण्यात आली. ज्याचा खून झाला होता त्याचे चुलते अब्दुल रहमान अल-फलाज यांनी ‘देशाच्या न्याय्य न्यायसंस्थेकडून न्याय मिळाला’, अशा शब्दांत समाधान व्यक्त केले.राजा असो वा रंक, देशात सर्वांना समान कायदा लागू आहे, हे जनतेच्या मनावर बिंबविण्यासाठी गृह मंत्रालयाने राजपुत्र कबीर यांच्या मृत्यूदंडाची माहिती जाहीर करताना, जो कोणी असा गुन्हा करण्यास धजावेल त्यालाही शरियानुसार अशीच शिक्षा होईल, असे मुद्दाम नमूद केले.राजघराण्यातील व्यक्तीलाच अशा प्रकारे देहदंड दिला जाणे विरळा असले तरी असे यापूर्वीही घडले आहे. सन १९७५ मध्ये सौदी सम्राट फैसल यांच्या हत्येबद्दल राजघराण्यातीलच फैसल बिन मुसैद बिल अब्दुलअझीझ अल सौद यांना मृत्यूदंड दिला गेला होता. (वृत्तसंस्था)>कठोर शरियत कायदेसुन्नी पंथीय सौदी अरबस्तानात अत्यंत कठोर असे फौजदारी शरियत कायदे लागू आहेत. त्यानुसार खून, अमली पदार्थांचा व्यापार, सशस्त्र दरोडा व धर्मनिंदा अशा गंभीर गुन्ह्यांसाठी देहदंडाची तरतूद आहे. यासाठी दोषी ठरणाऱ्या आरोपीचा जाहीरपणे शिरच्छेद करण्याची पद्धत रूढ आहे.अ‍ॅमेनेस्टी इंटरनॅशनलने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक मृत्यूदंड देण्यामध्ये इराण व पाकिस्ताननंतर सौदी अरबस्तानचा तिसरा क्रमांक लागतो. राजपुत्र कबीर यांचा मृत्यूदंड यंदाच्या वर्षा तील १३४वा होता. गेल्या वर्षी एकूण १५८ जणांना देहदंड दिला गेला होता.