शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

हॉकिंग यांच्या सिद्धान्ताचे प्रयोगशाळेत निरीक्षण

By admin | Updated: August 19, 2016 04:27 IST

काही कण कृष्णविवरातून निसटू शकतात या ब्रिटिश शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्या सिद्धान्ताचे पहिल्यांदा निरीक्षण केल्याचा दावा प्रयोगशाळेत आभासी कृष्णविवर तयार करणाऱ्या

जेरुसलेम : काही कण कृष्णविवरातून निसटू शकतात या ब्रिटिश शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्या सिद्धान्ताचे पहिल्यांदा निरीक्षण केल्याचा दावा प्रयोगशाळेत आभासी कृष्णविवर तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांनी केला आहे. हॉकिंग यांनी ३० वर्षांपूर्वी हा सिद्धांत मांडला होता. कृष्णविवरातून होणाऱ्या उत्सर्जनाबाबतचा हॉकिंग यांचा सिद्धांत खरा असल्याचे सिद्ध करण्यासाठी इस्रायल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी येथील भौतिकशास्त्रज्ञ जेफ स्टेईनहावर यांनी प्रयोगशाळेत आभासी कृष्णविवर तयार केले. स्टेईनहॉवर यांचा प्रयोग प्रकाशाऐवजी ध्वनीवर आधारित आहे. आभासी कृष्णविवराचा एक भाग म्हणून माझ्या प्रयोगशाळेत मी हॉकिंग उत्सर्जनाच्या भौतिक परिणामांचे अवलोकन केले, असे ते म्हणाले. कृष्णविवरातून काहीही अगदी प्रकाशही निसटू शकत नाही, असे शास्त्रज्ञांचे दीर्घकाळ मत होते. तथापि, १९७४ मध्ये स्टीफन हॉकिंग यांनी काही कण कृष्णविवरातून निसटू शकतात, असा नवा सिद्धांत मांडला होता. हॉकिंग यांच्या सिद्धांतानुसार, एक कण आणि त्याचे प्रतिद्रव्य उत्स्फूर्तपणे कृष्णविवराच्या काठावर आल्यास या जोडीतील एक भाग कदाचित कृष्णविवरात ओढला जाईल, तर दुसरा निसटेल आणि निसटताना तो कृष्णविवराची काही ऊर्जाही सोबत नेईल. कृष्णविवरे लहान का असतात आणि अखेरीस नष्ट का होतात हे यातून स्पष्ट होईल. तथापि, हे उत्सर्जन अत्यंत क्षीण असल्यामुळे हॉकिंग उत्सर्जनाचे कोणालाही मोजमाप करता आलेले नाही. मोजमापाऐवजी संशोधकांनी या सिद्धांताचे परीक्षण करण्यासाठी प्रयोगशाळांत आभासी कृष्णविवरांची निर्मिती केली. (वृत्तसंस्था)असा केला प्रयोगद्रव्याच्या अगदी अंशाएवढ्या भागात फोनोन्सची एकमेकांत गुंतलेली जोडी बसवायची आणि नंतर या द्रव्याला प्रचंड वेगाने फिरवून पुढील क्रियेचे निरीक्षण करायचे, असा स्टेईनहॉवर यांचा प्रयोग होता. हे द्रव्य ध्वनीहून अधिक वेगाने फिरू लागल्यानंतर फोनान्सच्या जोडीतील एक निसटतो, असे या प्रयोगात आढळून आले.