शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

इराणच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा हसन रुहानी

By admin | Updated: May 21, 2017 11:15 IST

इराणचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी हे सलग दुस-यांदा राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान होणार आहेत. राष्ट्रपती निवडणुकीत ते विजयी ठरले आहेत.

ऑनलाइन लोकमत 
तेहरान, दि. 21- इराणचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी हे सलग दुस-यांदा राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान होणार आहेत. राष्ट्रपती निवडणुकीत ते विजयी ठरले आहेत. त्यांनी मुख्य प्रतिस्पर्धी इब्राहिम रईसी यांचा पराभव केला आहे.  मतमोजणीच्या वेळी त्यांनी मोठी आघाडी घेतली होती.  दोन कोटी 59 लाख मतांची मोजणी पूर्ण झाली त्यावेळी रुहानी यांना निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे एक कोटी 46 लाखापेक्षा जास्त मते मिळाली होती. त्याचवेळी हसन रुहानी सलग दुस-यांदा राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान होणार हे निश्चित झालं होतं. 
 
रुहानी यांचे मुख्य प्रतिस्पर्धी इब्राहिम रईसी यांच्याशिवाय मोस्तफा मीरसाली आणि मोस्तफा हासीमीताबा हे दोघे सुद्धा शर्यतीत होते पण त्यांना फक्त काही टक्के मते मिळतील. इराणच्या भविष्याच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्वाची होती. इराणमध्ये शुक्रवारी जवळपास 4 कोटी नागरीकांनी मतदानाचा हक्क बजावला. इराणमध्ये मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. 
 
चार वर्षांपूर्वी इराणची सत्ता मिळवताना रुहानी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील इराणचा विजनवास संपवण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी कामही केले. इराणचे दरवाजे जगासाठी खुले केले. अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्याचा प्रयत्न केला. ही निवडणूक म्हणजे मतपेटीतून फक्त जनतेचा कौल नसून, रुहानी यांनी जी धोरणे राबवली त्यावर जनतेने दिलेला निकाल आहे. 2015 मध्ये रुहानी यांनी जागतिक महासत्तांबरोबर इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रम मर्यादा आणण्याचा करार करुन  जागतिक निर्बंधातून सवलत मिळवली.