शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

हॉलएवढा मोठा होता जगातील पहिला संगणक

By admin | Updated: June 25, 2017 00:25 IST

संगणक आज आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. मोबाईलच्या रूपाने तो आज अगदी प्रत्येकाच्या हातात आहे

वॉशिंग्टन : संगणक आज आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. मोबाईलच्या रूपाने तो आज अगदी प्रत्येकाच्या हातात आहे; परंतु जगातील पहिला संगणक कसा असेल याची तुम्ही कधी कल्पना केली आहे का? संगणकाचा आकार दिवसेंदिवस लहान होत आहे. अगदी घरात वापरण्यात येणारे संगणकही (मॉनिटर, सीपीयू, की बोर्ड आणि माऊस) आता आऊटडेटेड होत असून त्यांची जागा छोटे लॅपटॉप आणि पामटॉपने घेतली आहे. लवकरच याहूनही छोटे संगणक येतील. तथापि, आकार लहान असूनही त्यांची कार्यक्षमता मात्र त्यांच्यापेक्षा अनेक पटीने जास्त असेल. छायाचित्रात तुम्ही जो पाहत आहात तो जगातील पहिला संगणक आहे. अमेरिकेच्या पेनसिल्वेनिया विद्यापीठात १५ फेब्रुवारी १९४६ रोजी तयार करण्यात आलेला हा संगणक एखाद्या मोठ्या हॉलएवढा मोठा होता. त्यात तारांचे विशाल गुच्छ होते. अनेक माणसे मिळून तो चालवत. या अवाढव्य संगणकाचा तेव्हा अमेरिकी लष्करासाठी उपयोग केला जात होता. नंतर संगणक तंत्रज्ञान विकसित होत गेले. त्यांचा आकार लहान आणि कार्यक्षमता वाढत गेली. आज आमच्या हातात असलेले छोटे स्मार्टफोनही या संगणकाहून हजार पटीने कार्यक्षम आणि आधुनिक आहेत.