शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

हाफिजच्या उलट्या बोंबा, २६/११ च्या मुंबई हल्ल्याचा केला निषेध

By admin | Updated: August 31, 2015 13:25 IST

२६/११ च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या हाफिज सईदने उलट्या बोंबा ठोकत मुंबई हल्ल्याचा निषेध दर्शवला आहे.

ऑनलाइन लोकमत 

इस्लामाबाद, दि. ३१ - २६/११ च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या हाफिज सईदने उलट्या बोंबा ठोकत मुंबई हल्ल्याचा निषेध केला आहे. माझा या हल्ल्यात सहभाग नव्हताच व भारत माझ्याविरोधातील आरोप सिद्ध करु शकणार नाही असा दावाही हाफिजने केला आहे. 
हाफिज सईदने नुकतेच पाकिस्तानमधील वृत्तवाहिनीशी संवाद साधताना मुंबई हल्ल्याविषयी भाष्य केले. मुंबईत दहशतवादी हल्लासाठी भारताने माझ्यावर आरोप केले. मी त्यावेळी तातडीने स्थानिक प्रसारमाध्यमांशी संपर्क साधून या हल्ल्याशी संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. भारत माझ्यावरील आरोप सिद्ध करु शकणार नाही हे मी त्यावेळीही सांगितले व अजूनही भारत आरोप सिद्ध करु शकलेला नाही असे त्याने म्हटले आहे. 
भारताने हाफिज सईदविरोधात सर्व पुरावे पाकिस्तानकडे सुपूर्त केला आहे. मुंबईवर हल्ला करणारा अजमल कसाब व नुकतेच जम्मू काश्मीरमध्ये पकडले गेलेले सज्जाद अहमद व मोहम्मद नावेद या पाकिस्तानी दहशतवाद्यांनीही हाफिज सईदच्या दहशतवादी कारवायांमधील सहभागाविषयीची माहिती उघड केली आहे. मात्र त्यानंतरही हाफिज सईद पाकमध्ये मोकळा फिरत आहे.