शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रहितासाठी हाफिज सईद नजरकैदत - पाकिस्तान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2017 10:33 IST

डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लिमबहुल देशांतील नागरिकांना अमेेरिका प्रवेशबंदी केल्यानंतर पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे. हाफिज सईदला राष्ट्रहितासाठी नजरकैद ठेवले असून आम्हाला भारतासोबत युद्ध नकोय, अशी भूमिका पाकिस्तानने मांडली आहे.

ऑनलाइन लोकमत

इस्लामाबाद, दि. 1 -  सात मुस्लिम बहुल देशांतील नागरिकांना अमेरिका प्रवेश बंदी घालण्यात आल्यानंतर या यादीत आगामी काळात पाकिस्तानाचाही समावेश होणार असल्याचे अमेरिकेकडून देण्यात आले आहेत. यामुळे पाकिस्तानची घाबरगुंडी उडाल्याचे पाहायला मिळत आहे.  

या पार्श्वभूमीवर 'जमात-उद-दावाचा प्रमुख आणि कुख्यात दहशतवादी हाफिज सईदला राष्ट्रहितासाठी नजरकैद ठेवण्यात आले असून भारतासोबत आम्हाला युद्ध करायचे नाही', अशी भूमिका पाकिस्तानी सैन्याने मांडली आहे. 'राष्ट्रहितासाठी घेण्यात आलेल्या धोरणात्मक निर्णयांतर्गत हाफिज सईदवर नजरकैदेची कारवाई करण्यात आली आहे', असे पाकिस्तानी सैन्याने मंगळवारी सांगितले.  शिवाय, आम्हाला भारतासोबत युद्ध करायचे नाही, असा दावा करतेवेळी या निर्णयाला पाकिस्तानची कमजोरी समजू नका, अशा फुशारक्याही पाकिस्ताननं मारल्या आहेत. 
 
पाकिस्तानातील इंटर-सर्विसेज पब्लिक रिलेशन्स (ISPR)चे डीजी मेजर जनरल आसिफ गफूर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना हे विधान केले आहे. पाकिस्तानातील वृत्तपत्र 'डॉन'ने दिलेल्या माहितीनुसार, आसिफ गफूर यांनी हाफिज सईदला नजरकैदेत ठेवण्यामागे कोणत्याही अन्य देशांचा दबाव असल्याच्या बातम्यांना फेटाळून लावले. जमात-उद-दावाचा प्रमुख आणि मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदला सोमवारी पाकिस्तानात नजरकैदेत ठेवण्यात आले. पाकिस्तान सरकारकडून जमात-उद-दावावरही कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
 
(हाफिज सईदवर विश्वासार्ह कारवाई करा, भारतानं पाकला ठणकावलं)
 
दरम्यान, आसिफ गफूर यांनी भारत-पाकिस्तानमधील वाढलेल्या तणावासंदर्भात भाष्य करताना सांगितले की, 'आम्हाला कुणाही सोबत युद्ध नकोय. युद्ध हे कोणत्याही समस्येवरील समाधान नाही', असा सभ्यपणाचा आव आणला. मात्र याचवेळी काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत 'संयुक्त राष्ट्रांच्या चर्चेच्या माध्यमातून आम्हाला काश्मीर समस्येवर तोडगा हवाय, मात्र शांततेसाठीच्या आमच्या इच्छेला कमजोरी समजण्याची चूक करू नका', अशी दुटप्पी भूमिकाही पाकिस्तानने यावेळी मांडली.
 
डॉनने दिलेल्या बातमीनुसार, आसिफ गफूर यांनी भारताने पाकिस्तानविरोधात केलेल्या सर्जिकल स्ट्राईक कारवाईला 'ड्रामा'चा एक 'भाग' असल्याचा थयथयाट केला. शिवाय, काश्मीरच्या मुद्यावरुन जगाचे लक्ष भरकटवण्यासाठी भारत असे वागत असल्याचा कांगावाही त्यांनी केला.