शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

झोमॅटोची वेबसाइट हॅक करून 1.7 कोटी युझर्सचा डेटा चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2017 13:58 IST

झोमॅटो या फूड-टेक कंपनीची वेबसाइट हॅक करून 1.7 कोटी ग्राहकांचा वैयक्तिक डेटा चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला

ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. 18 - अनेक देशांमधल्या 10 हजारांहून अधिक शहरांतील ग्राहकांची खाण्याची चंगळ पुरवणा-या झोमॅटो या फूड-टेक कंपनीची वेबसाइट हॅक करून 1.7 कोटी ग्राहकांचा वैयक्तिक डेटा चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. झोमॅटो या वेबसाइटवरून 1.7 कोटी युझर्सचे ई-मेल आयडी आणि पासवर्ड चोरण्यात आले आहेत. झोमॅटो फूड टेक कंपनी युझर्सना त्यांच्या शहरांतील हॉटेल, खाण्यांसह इतर ठिकाणांची माहिती पुरवते. कंपनीच्या वेबसाइटवरून मागवलेले पदार्थ घरपोचही पाठवले जातात. मात्र ही सुविधा मिळवण्यासाठी युझर्सला आधी वेबसाइटवर नोंदणी करावी लागते. यूझर्सचे नाव, मोबाईल क्रमांक आणि पत्ता आदी माहिती साइटवर नोंदणीसाठी द्यावी लागते. भारतातही मोठ्या प्रमाणात या वेबसाइटचा वापर केला जातो. ही वेबसाइट हॅक झाल्यामुळे जवळपास 1 कोटी 70 लाख युझर्सचे ई-मेल आयडी आणि पासवर्ड चोरल्याची माहिती हॅकरीड या सिक्युरिटी ब्लॉगकडून देण्यात आली आहे. वेबसाइट हॅक करून हॅकर्सनं युझर्सची सर्व माहिती मिळवली आहे. झोमॅटो या कंपनीविरोधात भारतीय कायद्यानुसार कारवाई होण्याची शक्यता आहे. या कायद्यांतर्गत वेबसाइटच्या असुरक्षिततेमुळे युझर्सची माहिती चोरीला गेल्यामुळे युझर्सला कंपनीकडून नुकसानभरपाईही दिली जाऊ शकते. या वेबसाइटचा दर महिन्याला 9 कोटी युझर्स फायदा उचलतात, असेही कंपनीनं सांगितलं आहे. युझर्सचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचंही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. यूझर्सचे ई-मेल आयडी आणि इतर डेटा चोरला असला तरी त्यांच्या क्रेडिट कार्डची माहिती आणि इतर अर्थिक बाबींची माहिती सुरक्षित असल्याचीही कंपनीनं म्हणणं आहे. तसेच युझर्सनं घाबरून न जाता सामोपचाराची भूमिका घ्यावी, असंही कंपनीनं म्हटलं आहे.