शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

एच१बी व्हिसाधारकाच्या जोडीदारास नोकरीबंदी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2017 00:35 IST

बराक ओबामा प्रशासनाने एच वन बी व्हिसाधारकांच्या पती किंवा पत्नीला अमेरिकेत काम करण्यास परवानगी दिलेल्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले गेले

वॉशिंग्टन : बराक ओबामा प्रशासनाने एच वन बी व्हिसाधारकांच्या पती किंवा पत्नीला अमेरिकेत काम करण्यास परवानगी दिलेल्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले गेले असून, त्याला उत्तर देण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने ६० दिवसांची मुदत मागितली आहे. ओबामा प्रशासनाने आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात घेतलेल्या या निर्णयाचे एच वन बी व्हिसाधारकांनी (त्यात प्रामुख्याने भारतीय होते) स्वागत केले होते तर अनेक अमेरिकन गटांनी या निर्णयाला वॉशिंग्टन डीसीतील फेडरल न्यायालयात आव्हान दिले. १ फेब्रुवारी रोजी न्याय विभागाने कोलंबियातील न्यायालयात दाखल केलेल्या अपिलात ६० दिवसांसाठी त्या निर्णयाची अंमलबजावणी स्थगित करावी, अशी विनंती केली होती. आगामी नेतृत्वाला या विषयावर विचार करायला पुरेसा वेळ मिळेल, असे सांगून सरकारने ६० दिवसांची मुदत मागितली होती. इमिग्रेशन व्हॉइसने मंगळवारी निवेदनात म्हटले आहे की, विद्यमान अ‍ॅटर्नी जनरल जेफ सेशन्स हे अमेरिकेचे सिनेटर असताना त्यांनी ट्रम्प प्रशासनाचा निर्णय हा ‘विशेष काळजी’चा असल्याचे म्हटले होते. सेशन्स यांनी नियमातील बदल हा अमेरिकन कामगारांच्या हिताला बाधा आणणारा असल्याचे नमूद केले होते. स्थलांतरितांना अमेरिकेत प्रवेशबंदी केल्यानंतर ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयामुळे अमेरिकेत आता कायदेशीर मार्गांनी वास्तव्य करणाऱ्या विदेशी कामगारांनाही अडचणी येणार आहेत. (वृत्तसंस्था)भारतीयांवर परिणाम- एच-फोर व्हिसाधारकांना रोजगाराची परवानगी देणाऱ्या ट्रम्प प्रशासनाच्या नियमाला ट्रम्प प्रशासनाने ६० दिवसांची स्थगिती मागितली आहे. या नियमाच्या आधारावर हजारो भारतीय पती किंवा पत्नी अमेरिकेत येतात. हा नियम अंमलात येताच सेव्ह जॉब्ज यूएसएने खटला दाखल केला होता. परंतु जिल्हा न्यायालयाने सेव्ह जॉब्ज यूएसएला न्यायालयात फिर्याद करण्याचा अधिकार नसल्याचे सांगून ओबामा प्रशासनाचा निर्णय योग्य ठरवला होता.