शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

गुगलला पडले ‘एप्रिल फुल’ महाग

By admin | Updated: April 2, 2016 03:48 IST

१ एप्रिल आला की चेष्टेखोर लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. या दिवशी गंमतीने दुसऱ्यांना मूर्ख बनविण्यास काहीच हरकत नाही. कोणतेही नुकसान किंवा हानी पोहचणार

वॉशिंग्टन : १ एप्रिल आला की चेष्टेखोर लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. या दिवशी गंमतीने दुसऱ्यांना मूर्ख बनविण्यास काहीच हरकत नाही. कोणतेही नुकसान किंवा हानी पोहचणार नाही अशी चेष्टा चालेल; पण एका मर्यादेपर्यंतच. नाही तर गुगलसारखे तोंडघशी पडावे लागते.एप्रिल फुल दिनानिमित्त गुगलने ‘जीमेल’ यूजर्सची मजा घेण्याकरिता ‘सेंड अँड माईक ड्रॉप’ हा नवीन आॅप्शन उपलब्ध करून दिला. ‘डिस्पेकेबल मी’ चित्रपटातील गोंडस आणि महाचेष्टेखोर ‘मिनियन्स’चा यामध्ये उपयोग करण्यात आला. यानुसार तुम्ही एखाद्याला मिनियन्सचे अ‍ॅनिमेशन असलेले ईमेल पाठवून त्याच्याशी कायमचा संवाद थांबवू शकता. समोरचा व्यक्ती तुम्हाला पुन्हा रिप्लाय करू शकणार नाही.इथपर्यंत सर्व ठीक होते. परंतु या ‘सेंड अँड माईक ड्रॉप’ आॅप्शनचे बटण ईमेल पाठविण्याच्या (सेंट) बटणाशेजारी ठेवण्यात आल्याने सगळा गोंधळ उडाला. अनेक लोकांनी महत्त्वाच्या ईमेल्सला रिप्लाय देताना मजेशीर अ‍ॅनिमेशन पाठविले. एका यूजरला तर गुगलच्या या प्रँकमुळे हातची नोकरी गमवावी लागली. (वृत्तसंस्था)गुगलच्या सपोर्टपेज वर लोकांनी धडाधड तक्रारी पोस्ट केल्या. सोशल मीडियावरदेखील नेटिझन्समध्ये नाराजीचा सूर दिसून आला. एक्सओएक्सओ फेस्टिव्हलचा संस्थापक अँडी बायोने ट्विट केले की, मी देखील चुकून महत्त्वाच्या ईमेलमध्ये मिनियन्सचे अ‍ॅनिमेशन पाठवले. मला आश्चर्य वाटते की, गुगल इतक्या बेजबाबदारपणे वागेल. यामुळे होणाऱ्या नुकसानीला गुगलच जबाबदार आहे. प्रकरण गरम होताना पाहून गुगलेनेदेखील ही सुविधा मागे घेतली आणि स्वत:ची चुक मान्य केली.