आफ्रिका खंडातील युगांडा या देशाच्या लष्करप्रमुखाने तुर्कीला दिलेल्या एका अजब धमकीची सध्या आंतरराष्ट्रीय वर्तुळात सध्या एकच चर्चा सुरू आहे. तुर्कीने आपल्याला सुमारे एक अब्ज डॉलर (अंदाजे नऊ हजार कोटी रुपये) आणि लग्नासाठी देशातील एक सुंदर तरुणी द्यावी, जर या मागण्यांची ३० दिवसांच्या आत पूर्तता झाली नाही तर युगांडामधील तुर्कीचा दूतावास बंद केला जाईल, अशी धमकी युगांडाचा लष्कर प्रमुख जनरल मुहुजी केनेरुगाबा याने दिली आहे.
केनेरुगाबा याने ११ एप्रिल रोजी एक्सवर अनेक पोस्ट केल्या आहेत. त्यात त्याने लिहिले की, युगांडा हा गेल्या २० वर्षांपासून सोमालियामधील अल शबाब या दहशतवादी संघटनेशी लढत आहे. ही संघटना अल कायदाशी संबंधित आहे. या संघटनेविरोधात लढण्यासाठी युगांडाने सैन्य तैनात केले असून, त्यातील अनेक सैनिकांनी प्राण गमावले आहेत.
या दरम्यान तुर्कीने सोमालियामध्ये अनेक विकासकामे करून पैसा कमावला आहे. मात्र सुरक्षेचं सगळं ओझं हे युगांडाच्या खांद्यावर टाकलं. त्यामुळे तुर्कीने युगांडाला एक अब्ज डॉलर दिले पाहिजेत, अशी मागणी त्याने केली आहे.
या बरोबरच केनेरुगाबा यांनी तुर्कीकडे लग्नासाठी एका मुलीचीही मागणी केली आहे. तसेच ही आपली वैयक्तिक मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले. केनेरूगाबा यांनी हे विधान गंमत म्हणून केलं असलं तरी त्यावर आता टीका होत आहे.
तसेच आपल्या या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तुर्कीचा युगांडा मधील दूतावास बंद करण्याचा इशारा केनेरुगाबा यांनी दिला आहे. तसेच तुर्कीच्या विमान कंपन्यांना युगांडाच्या हवाई हद्दीतून जाऊ देण्यास मनाई करण्याचा इशाराही केनेरुगाबा याने दिला आहे.मुहुजी केनेरुगाबा हा युगांडाच्या लष्कराचा प्रमुख आहे. तसेच तो युगांडाचे राष्ट्रपती योवोरी मुसेवेनी यांचा मुलगा आहे. तसेच त्याला मुसेवेनी यांचा उत्तराधिकारीही मानले जात आहे.
Web Summary : Uganda's army chief, General Muhoozi Kainerugaba, demanded Turkey provide $1 billion and a beautiful woman for marriage. Failure to comply within 30 days will result in the closure of the Turkish embassy in Uganda and a ban on Turkish airlines.
Web Summary : युगांडा के सेना प्रमुख जनरल मुहुजी केनेरुगाबा ने तुर्की से 1 बिलियन डॉलर और शादी के लिए एक खूबसूरत महिला की मांग की है। 30 दिनों के भीतर ऐसा न करने पर युगांडा में तुर्की दूतावास बंद कर दिया जाएगा और तुर्की एयरलाइंस पर प्रतिबंध लगा दिया जाएगा।