बर्लिन- मित्राबरोबर व्हिडिओगेम खेळण्यासाठी २३ वर्षांच्या तरुणाने आपल्या प्रेयसीला गुंगीचे औषध दिल्याची घटना घडली असून, तशी कबुली त्याने न्यायालयासमोर दिली आहे. मी तिच्या चहात फक्त चार-पाच थेंब गुंगीचे औषध टाकले असे तो म्हणाला. आॅगस्ट २०१४ मध्ये हा तरुण मित्राबरोबर व्हिडिओ गेम खेळत होता. तेवढ्यात त्याची मैत्रीण घरी आली. त्याने तिच्या चहात गुंगीचे औषध दिले व स्वत: व्हिडिओ गेम खेळत बसला. ती मैत्रीण दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत झोपली. तिने न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार ती उठून कार्यालयात गेली; पण आपण मान हलवत आहोत असा तिला भास होत होता. ही युवती दीर्घकाळ झोपल्यामुळे त्याला आपण काही चुकीचे केल्याचे वाटत होते. न्यायालयाने त्याला प्राथमिक स्तरावरील शारीरिक दुखापत केल्याप्रकरणी दोषी ठरवले असून, ५०० युरोचा दंड केला आहे. (वृत्तसंस्था)
व्हिडिओगेम खेळण्यासाठी प्रेयसीला गुंगीचे औषध
By admin | Updated: July 10, 2015 01:42 IST