शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

ढिगा-याखाली अडकलेल्या तरूणाला तब्बल ८० तासांनी मिळाले जीवदान

By admin | Updated: April 29, 2015 13:47 IST

भूकंपामुळे उध्वस्त झालेल्या इमारतीच्या ढिगा-याखाली अडकलेल्या एका तरूणाला तब्बल ८० तासांनंतर जीवदान मिळाले आहे.

ऑनलाइन लोकमत
काठमांडू, दि. २९ -  नेपाळमधील भूकंपामुळे हजारो जीव मृत्यूमुखी पडलेले असतानाच एका तरूणाच्या बाबतीत मात्र ' काळ आला होता पण वेळ आली नव्हती' अशी घटना घडली आहे. भूकंपामुळे उध्वस्त झालेल्या इमारतीच्या ढिगा-याखाली अडकलेल्या  ऋषी खनाल या २८ वर्षीय तरूणाला बचावपथकाने तीन दिवसांनतर ढिगा-याखालून जिवंतपणे बाहेर काढल्याने त्याला जीवदान मिळाले आहे.
शनिवारी आलेल्या शक्तिशाली भूकंपानंतर नेपाळ अक्षरश: उध्वस्त झाले, हजारो लोक मृत्यूमुखी पडले तर कित्येक जण जखमी झाले. बचावपथकातील अधिकारी जखमींचा शोध घेत असतानाच काठमांडू येथील गोगंबू भागात एका सातमजली इमारतीच्या ढिगा-याखाली तरूण अडकल्याची माहिती मिळाली. बचाव पथकाच्या अधिका-यांवी अथक परिश्रम करत तब्बल तीन दिवसांनी ऋषीला ढिगा-याखालून जिवंत बाहेर काढले. तीन दिवस तो अन्नपाण्यावाचून ढिगा-याखाली पडलेला होता, त्याच्या आजूबाजूला असलेल्या मृतदेहांचा दुर्गंध सहन करत असतानाही आपल्याला वाचवायला कोणीतरी येईल, या एकाच दुर्दम्य आशेवर तो जिवंत राहिला. दैव बलवत्तर असल्याने या दुर्दैवी घटनेतून वाचलेल्या ऋषीच्या पायाचे हाड मोडले असून त्याच्यावर सध्या रुग्णालयातउपचार सुरू आहेत.
नेपाळमधील भूकंपाला पाच दिवस उलटले असून या दुर्दैवी घटनेतील मृतांचा आकडा ५ हजारांच्यावर पोचला आहे.