ब्रिस्बेन : जी-२० शिखर परिषदेत रविवारचा दिवस खास भारताचा ठरला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेली काळ्या पैशांबाबतची भूमिका संपूर्ण संघटनेने उचलून धरली. काळ्या पैशांबाबत पारदर्शी धोरण हवे तसेच त्याची माहिती उघड करता आली पाहिजे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते. ही भूमिका जी -२० संघटनेने उचलली. काळ्या पैशांची माहिती आपोआप मिळावी त्यासाठी नवे जागतिक धोरण ठरवावे, असे मोदी यांचे म्हणणे होते. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद अकबरुद्दीन यांनी पत्रकारांना माहिती दिली. पारदशर््िाता हा शब्द परिषदेच्या मसुद्यात नव्हता. पंतप्रधान मोदी यांनी हस्तक्षेप करून मांडलेल्या प्रभावी भूमिकेनंतर हा शब्द मसुद्याच्या अंतिम स्वरूपात समाविष्ट करण्यात आला, असे या दोघांनी सांगितले. परदेशात ठेवलेल्या पैशांची माहिती नव्या तंत्रज्ञानानुसार मिळाल्यास तो पैसा परत आणता येणे शक्य होईल, असे मोदी म्हणाले. काळा पैसा ठेवून घेणाऱ्या देशांनी नियमानुसार कर घ्यावा यालाही भारताचा पाठिंबा असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले.
काळ्या पैशांसाठी भारताच्या भूमिकेला ‘जी-२०’चा पाठिंबा
By admin | Updated: November 17, 2014 04:33 IST