- कुणाल गवाणकर
राज्यात कोरोनानं धुमाकूळ घातला असताना, त्यामुळे लॉकडाऊन सुरू असताना येस बँक घोटाळा प्रकरणातल्या वाधवान कुटुंबानं सुखेनैव प्रवास केला. सामान्य माणसं आपापल्या घरी परतण्यासाठी शेकडो किलोमीटर चालत असताना वाधवान कुटुंब आलिशान गाड्यांमधून महाबळेश्वरला पोहोचलं. कारण त्यांच्याकडे गृहसचिव अमिताभ गुप्ता यांचं पत्र होतं. त्या पत्रानं त्यांचा लॉकडाऊनमधला प्रवास सुखकर केला. आपल्याकडे हे घडण्यापूर्वी गेल्याच आठवड्यात अशीच एक घटना फ्रान्समध्ये घडली. पण तिथे जे घडलं ते महाराष्ट्रापेक्षा वेगळं आणि भारी होतं.
चार एप्रिल, शनिवार.. ठिकाण- फ्रान्समधलं मार्सेलंडनमधून सुट्टी घालवण्यासाठी काही अतिश्रीमंत व्यक्तीचं खासगी जेट मार्सेमध्ये उतरलं. खरंतर स्थानिक प्रशासनानं त्यांना विमान परवानगी नाकारली होती. मात्र तरीही जेट मार्सेमध्ये उतरवण्यात आलं. त्या जेटमध्ये चाळीशी, पन्नाशीतले सात पुरुष आणि विशीतल्या तीन तरुणी होत्या. जेट उतरल्या उतरल्या स्थानिक पोलिसांनी धाव घेतली आणि सुरू झाला चौकशीचा सिलसिला.मार्सेमध्ये दाखल झालेली अतिश्रीमंत मंडळी 'एम्ब्रार लिगसी 600' या जेटनं जेटनं आली होती. या जेटची किंमत आहे ५ मिलियन पौंड. त्यावरुन जेटमधल्या मंडळींच्या श्रीमंतीची कल्पना यावी. लंडनहून जवळपास साडे सातशे किलोमीटर अंतर पार करून आलेली ही मंडळी पुढे कान्सला जाणार होती. त्यासाठी तीन हेलिकॉप्टर्सदेखील सज्ज होती. ब्रिटनमध्ये बँकिंग आणि एस्टेट कंपनीत काम करणाऱ्या एका क्रोएशियन व्यक्तीनं या संपूर्ण दौऱ्याचं आयोजन केलं होतं. जेट, हेलिकॉप्टरपासून ते अगदी कान्समधला व्हिला भाड्यानं घेण्याची सर्व जबाबदारी याच व्यक्तीनं उचलली होती. या व्हिलाचं एका दिवसाचं भाडं ५० हजार पौंड म्हणजेच भारतीय रुपयांत साधारणत: ४७ लाखांहून अधिक आहे.
---------------------------
परदेशातले कायदे अतिशय कठोर असतात. कायद्यासमोर सगळे समान असतात. पण काही जण जरा जास्तच समान असतात, या जॉर्ज ऑर्वेलच्या जगविख्यात वाक्याची प्रचिती तिथे परदेशात (अर्थात चांगल्या यंत्रणांसाठी ओळखल्या जाणाऱ्या देशांमध्ये) सहसा येत नाही. लॉकडाऊनच्या काळातही तेच दिसलं. आपल्या आणि त्यांच्या यंत्रणेत हाच फरक आहे. यंत्रणा उत्तम असलेले देश जगात नावाजले जातात, हे अनेकांनी अनुभवलं असेल. देशाचं मोठेपण हे तिथल्या यंत्रणेत दडलेलं असतं ते असं.
-------------------
लॉकडाऊन काळात वाधवान यांना 'स्पेशल ट्रिटमेंट' देऊन महाराष्ट्र शासनाने मोठा गुन्हाच केला आहे. त्याची कठोर शिक्षा सर्व संबंधितांना मिळायला हवी. मार्सेमधील पोलिसांसारखी हिंमत आपले गृहमंत्री, मुख्यमंत्री, केंद्र सरकार (अमिताभ गुप्ता आयपीएस आहेत) दाखवणार का? कोरोनाच्या लढाईत आपण सगळे एकत्र आहोत, असं म्हणणारे, सगळे एकसमान आहेत आणि सगळ्यांना सारखाच न्याय, हेही सिद्ध करणार का?. पाहूया!