शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

फ्रान्स; संशयित महिला सिरीयात

By admin | Updated: January 13, 2015 00:05 IST

दहशतवादाचा निषेध करण्यासाठी फ्रान्समध्ये लाखो लोकांचा मोर्चा काढण्यात आला असताना , फ्रान्समधील सुरक्षा दले जिच्या शोधासाठी जंग जंग पछाडत आहेत

इस्तंबुल : दहशतवादाचा निषेध करण्यासाठी फ्रान्समध्ये लाखो लोकांचा मोर्चा काढण्यात आला असताना , फ्रान्समधील सुरक्षा दले जिच्या शोधासाठी जंग जंग पछाडत आहेत, त्या दहशतवादी महिलेने सिरियाची सीमा ८ जानेवारी रोजीच ओलांडली, असा दावा तुर्कस्तानचे परराष्ट्रमंत्री मेवलत कावुसोगलू यांनी केला आहे. हयात बौमेद्दीन असे या संशयित महिलेचे नाव असून पॅरिसमधील हल्ल्यातील आरोपींची ती महिला साथीदार आहे. तिची छायाचित्रे सर्वत्र प्रसिद्ध झाली असून, ती सशस्त्र व धोकादायक असल्याचा इशारा फ्रेंच पोलिसांनी दिला आहे. ही महिला २ जानेवारीला इस्तंबुलमध्ये आली असून ती हॉटेलमध्ये राहिली, असे कावसोगलू यांनी सांगितले. मग पॅरिसमधील हल्ल्यात ती सहभागी नव्हती असा अर्थ काढावा लागेल. त्याखेरीज हल्लेखोर मोकळे असतानाच ती सिरियाला चालती झाली असेही म्हणावे लागेल. पॅरिसमधील शार्ली हेब्डो साप्ताहिकावर ७ जानेवारी रोजी हल्ला झाला व कोशेर येथील ओलिस नाट्य शुक्रवारी ९ जानेवारीला संपले. या हिंसाचारात सहभागी असणारे तीनही हल्लेखोर आता मारले गेले आहेत. फ्रेंच पोलीस बौमेद्दीनचा शोध घेत आहेत. २६ वर्षाची ही महिला सशस्त्र व धोकादायक असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तुर्कस्तानी अधिकाऱ्यानी तिच्या ठावठिकाणांची माहिती फ्रेंच अधिकाऱ्याना दिली आहे. पॅरिस येथील रविवारच्या महामोर्चात जागतिक नेते हातात हात घालून सहभागी झाले. मुस्लिम व ज्यू नेत्यानी रविवारी पॅरिसच्या लाखो नागरिकांसोबत हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहिली. (वृत्तसंस्था)