शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

चार दहशतवाद्यांना फाशी

By admin | Updated: December 22, 2014 05:18 IST

पाकिस्तानात मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या आणखी चार दहशतवाद्यांना फैसलाबाद येथील तुरुंगात रविवारी फाशी देण्यात आली.

इस्लामाबाद : पाकिस्तानात मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या आणखी चार दहशतवाद्यांना फैसलाबाद येथील तुरुंगात रविवारी फाशी देण्यात आली. पाक सरकारने फाशीवरील बंदी उठविल्यानंतर देण्यात आलेली ही दुसरी फाशीची शिक्षा आहे. फाशी देण्यात आलेल्या आरोपीत, झुबैर अहमद, रशिद कुरेशी , गुलाम सरवर भट्टी, अखलक अहमद यांचा समावेश आहे. पाकिस्तानचे माजी लष्करशहा व हुकुमशहा यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप या चारजणांवर होता. फैसलाबाद तुरुंगात अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत ही शिक्षा देण्यात आली. पेशावर येथील शाळेवर झालेल्या निर्घृण हत्याकांडात १३२ मुलांचा बळी गेल्यानंतर पाक सरकारने फाशीच्या शिक्षेवरील सहा वर्षाची बंदी उठविली असून , त्यानंतर सहा जिहादींना फाशी देण्यात आलेली आहे.शुक्रवारी पाक सरकारने अकील उर्फ डॉक्टर उस्मान व अर्शद मोहम्मद या दोघांना फैसलाबाद तुरुंगातच फाशी दिली होती. डॉ. उस्मान हे नाव वापरणाऱ्या अकीलवर रावळपिंडी येथील लष्कराच्या मुख्य ठाण्यावर २००९ साली हल्ला केल्याचा तर अर्शदवर माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्यावर २००३ साली प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप होता. गुरुवारी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख राहिल शरीफ यांनी फाशीची शिक्षा झालेल्या सहा दहशतवाद्यांसाठी डेथ वॉरंटवर स्वाक्षरी केली होती. पाकिस्तानच्या नवाज शरीफ सरकारने दहशतवाद्यांचा बीमोड करण्याचा निर्धार केला असून , त्याअंतर्गत मृत्युदंडाच्या शिक्षेवरील बंदी उठविण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)