पेशावर : पाकिस्तानच्या वायव्येकडील पेशावर शहरात सुरक्षा दलाच्या एका ताफ्याला लक्ष्य करून मंगळवारी एक हल्ला करण्यात आला. यात एका मुलासह ४ जण मृत्युमुखी पडले, तर २३ जण जखमी झाले. पेशावरच्या सद्दार रोडवरून फ्रंटिअर कोअरचा ताफा जात असताना हा हल्ला झाला. पोलीसप्रमुख एजाज खान यांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर सांगितले की, फ्रंटिअरचे ब्रिगेडिअर खालिद जावेद यांना लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला. मात्र, ते यातून थोडक्यात बचावले.
पाकमध्ये स्फोटात ४ ठार; २३ जखमी
By admin | Updated: September 24, 2014 03:48 IST