शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चार आखाती देशांनी कतारशी संबंध तोडले

By admin | Updated: June 6, 2017 04:36 IST

मुस्लिम ब्रदरहूड, अल कायदा, इस्लामिक स्टेटला (आयएस) पाठिंबा देणे आणि इराणशी संबंध असल्याबद्दल चार अरब देशांनी कतारशी सोमवारी राजनैतिक संबंध तोडले.

दुबई : मुस्लिम ब्रदरहूड, अल कायदा, इस्लामिक स्टेटला (आयएस) पाठिंबा देणे आणि इराणशी संबंध असल्याबद्दल चार अरब देशांनी कतारशी सोमवारी राजनैतिक संबंध तोडले. या निर्णयामुळे आखातातील अरब देशांतील संबंध आणखी ताणले गेले आहेत. बहारिन, इजिप्त, सौदी अरेबिया व संयुक्त अरब अमिरातने कतारशी संबंध तोडल्याची घोषणा करताना आम्ही आमचे राजनैतिक कर्मचारी माघारी बोलावत आहोत, असे सांगितले. एमिरेट्स या विमान कंपनीने कतारमधील विमान सेवा बंद करण्याचे ठरविले असून, त्याची अंमलबजावणी उद्या, मंगळवारपासून होणार आहे. कतार हा नैसर्गिक वायूने समृद्ध असून २०२२ मध्ये जागतिक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद त्याच्याकडे आहे. शिवाय अमेरिकेचा कातारमध्ये १० हजार सैनिकांचा महत्त्वाचा लष्करी तळही आहे. सौदी अरेबियाने सध्या येमेनमध्ये सुरू असलेल्या युद्धातून कतारी सैनिकांच्या तुकड्यांना काढून घेण्यात येईल, असे म्हटले. कातारच्या मुत्सद्यांना हे चारही देश आपल्याकडून काढून टाकणार आहेत. दहशतवादी गटांना पैसा पुरवत असल्याचा कातारने सुरुवातीला इन्कार केला आहे. हे चारही देश कतारशी हवाई आणि सागरी संपर्क तोडणार आहेत. कतारचे राजे तमीम बिन हमाद अल थानी यांनी २७ मे रोजी इराणचे अध्यक्ष हसन रौहानी यांची भेट घेऊन त्यांच्या अध्यक्षपदी झालेल्या फेरनिवडीबद्दल अभिनंदन केले होते. सौदी अरेबिया या भेटीमुळे संतप्त झाला होता. इजिप्तने कतारवर दहशतवादी गटांना पाठिंबा दिल्याचा आरोप केला तर बहारिनने कतार व इराण आमच्या देशात घातपाती कारवाया करणाऱ्या गटांना पाठिंबा देत असल्याचे म्हटले आहे.>सार्वभौमत्वाचे उल्लंघन - कतारदोहा : इजिप्त आणि आखातातील तीन देशांनी राजनैतिक संबंध तोडण्याच्या घेतलेल्या निर्णयावर कतारने सोमवारी जोरदार टीका केली. हा निर्णय ‘अन्यायकारक’ असून कतारला राजकीय पालकत्वाखाली आणण्याचा हेतू त्यामागे आहे. उपाययोजना ही अन्यायकारक असून ती खोट्या आणि निराधार दाव्यांवर उभी आहे, असे कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटले. कतारवर पालकत्व लादण्याचा हा उघड प्रयत्न आहे. असा प्रयत्न करणे हेच कतार देशाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे, असे निवेदनात म्हटले.