शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘द फ्लार्इंग हाऊसवाईफ’ कालवश

By admin | Updated: October 6, 2014 00:06 IST

आकाशाला गवसणी घालत अवघ्या जगाला प्रदक्षिणा घालणारी गेराल्डीन मॉकने वयाच्या ८८ वर्षी जगाचा निरोप घेतला

क्लीव्हलँड (अमेरिका): आकाशाला गवसणी घालत अवघ्या जगाला प्रदक्षिणा घालणारी गेराल्डीन मॉकने वयाच्या ८८ वर्षी जगाचा निरोप घेतला. एक लहानशा विमानातून जगाची सफर करणारी ती पहिली गृहिणी होय. ६० च्या दशकातील मॉकच्या या अनोख्या धाडसाने अवघे जग चकीत तर झाले; शिवाय आकाश मोकळे करून दिले तर महिलाही उंच भरारी घेत यशोशिखर गाठू शकतात, याची खात्रीही तिने आपल्या साहसी कामगिरीतून पटवून देत महिलांना नवे क्षेत्र काबीज करण्याची उभारी दिली. क्विन्सी येथील राहत्या घरी तिने शेवटचा श्वास घेतला, असे तिची बहीण सुसा रिडने सांगितले.२२ नोव्हेंबर १९२५ रोजी ओहीओ प्रांतातील नेवार्क येथे गेराल्डीन मॉकचा जन्म झाला. तिला ‘ द फ्लार्इंग हाऊसवाईफ’ म्हणून ओळखले जात. तीन मुलांची आई असलेल्या गेराल्डीन मॉकने वयाच्या ३८ व्या वर्षी एकट्याने विमानातून जगाची सफर करण्याचा ‘विडा’ उचलीत १९६२ मध्ये तिने या जगाच्या हवाई सफरीचा बेत आखला. ११ वर्षे जुने असलेल्या ‘सेसना’ या छोटेखानी विमानात तिने आवश्यक ते बदल केले. एकच इंजिन असलेल्या या विमानात तीन अतिरिक्त इंधन टाक्या बसविण्यात आल्या. तसेच आॅटोपायलट प्रणाली आणि विशेष रेडिओ प्रणालीसह हे विमान सज्ज केले. ‘स्पिरीट आॅफ कोलंबस’ असे नावही तिने या विमानाला देऊन ती जगाला प्रदक्षिणा घालण्यासाठी सज्ज झाली. (वृत्तसंस्था)