शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

फ्लॉरेन्स लघुग्रह पृथ्वीच्या सर्वाधिक जवळून जाणार, ८०० लघुग्रहांची भाऊगर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 12:02 AM

४.४ चौ. किमी आकाराचा फ्लॉरेन्स नावाचा लघुग्रह येत्या १ सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या जवळून जाणार असून त्यामुळे कोणताही धोका नसल्याची खात्री वैज्ञानिकांनी दिली आहे.

वॉशिंग्टन : ४.४ चौ. किमी आकाराचा फ्लॉरेन्स नावाचा लघुग्रह येत्या १ सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या जवळून जाणार असून त्यामुळे कोणताही धोका नसल्याची खात्री वैज्ञानिकांनी दिली आहे. फ्लॉरेन्स लघुग्रहाची ही फेरी पृथ्वीपासून ७० लाख किमी म्हणजेच पृथ्वी व चंद्र यांच्यातील अंतराहून १३ पट अधिक दूरवरून होणार असली तरी ती लक्षणीय आहे. याचे कारण असे की, ‘नासा’ने अंतराळात स्वैरपणे भ्रमण करणाºया लघुग्रहांवर देखरेख ठेवण्याचे काम २० वर्षांपूर्वी सुरु केल्यापासून एवढ्या मोठ्या आकाराचा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जाण्याची ही पहिलीच वेळ असेल. आॅगस्टच्या अखेरच्या व सप्टेंबरच्या सुरवातीच्या दिवसात छोट्या दुर्बिणीतून फ्लॉरेन्स लघुग्रह दिसू शकेल. याआधी १२७ वर्षांपूर्वी म्हणजे सन १८९० मध्ये या लघुग्रहाने पृथ्वीच्या एवढ्या जवळून भम्रण केले होते.शेल्टे बस या खगोल वैज्ञानिकाने सन १९८१ मध्ये आॅस्ट्रेलियातील एका प्रयोगशाळेतून निरीक्षण करताना फ्लॉरेन्स लघुग्रहाचा शोध लावला होता. आधुनिक नर्सिंगची मुहूर्तमेढ रोवणाºया मिसेस फ्लॉरेन्स नाईटेंगेल यांचे नाव या उपग्रहास देण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)८०० लघुग्रहांची भाऊगर्दी‘नासा’ंनुसा निश्चित भ्रमणकक्षा नसलेले सुमारे ८०० लघुग्रह अंतराळात आहेत. फ्लॉरेन्स हा त्यातील सर्वात मोठा आहे. यापूर्वी असे लघुग्रह पृथ्वीवर आदळून विनाश घडला आहेत. ताजी घटना सन २०१३ च्या पूर्वार्धात घडली होती. तेव्हा२० मीटर लांबीचा व १० हजार टन वजनाचा एक लघुग्रह रशियात आदळला होता.अनेक लोक जखमी होण्याखेरीज हजारो चौ.किमी क्षेत्रातील जंगल त्यामुळे खाक झाले होते.