शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

पाकमध्ये पूरस्थिती; मदत कार्यासाठी लष्कर तैनात

By admin | Updated: September 11, 2014 23:45 IST

देशात न भूतो पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे पाकिस्तानला बचाव आणि मदत कार्यासाठी गुरुवारी लष्कर तैनात करावे लागले. २६० नागरिकांचा बळी घेणाऱ्या या पुराचा लाखो लोकांना फटका बसला आहे.

इस्लामाबाद : देशात न भूतो पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे पाकिस्तानला बचाव आणि मदत कार्यासाठी गुरुवारी लष्कर तैनात करावे लागले. २६० नागरिकांचा बळी घेणाऱ्या या पुराचा लाखो लोकांना फटका बसला आहे. पाकिस्तानची प्रमुख नदी असलेल्या चिनाबने देशाचा कृषिकणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंजाब प्रांतात आधीच प्रचंड विध्वंस घडवून आणला असून, ही नदी अद्यापही दुथडी भरून वाहत आहे.मुलकी प्रशासनाने पूरस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे सांगितल्यानंतर लष्कराला पाचारण करण्यात आले. लष्कर लोकांना वाचविण्यासाठी तसेच त्यांना अन्न व पाणी पुरविण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करत आहे. लष्कराने पाच सप्टेंबरपासून पंजाब व पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोहीम राबवून पुरामध्ये अडकून पडलेल्या २२ हजार लोकांना वाचविले. त्यांना नावा आणि हेलिकॉप्टरने सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले, असे लष्कराने प्रसिद्धीस दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. पंजाबमध्ये दहा लाखांहून अधिक लोकांना पुराचा तडाखा बसला आहे, असे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले. नदीकाठाजवळील सखल भागात राहणाऱ्या दहा लाख लोकांना नावा, हेलिकॉप्टरच्या साहाय्याने सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. हा पूर पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात घातक पूर असल्याचे पंजाबचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांनी म्हटले आहे. पाकमध्ये पाऊस आणि पुरामुळे आतापर्यंत २६० नागरिकांचा बळी गेला आहे. (वृत्तसंस्था)