शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

अस्वस्थ पाकिस्तान वाघा बॉर्डरवर उभारणार भारतापेक्षा उंच ध्वज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2017 14:26 IST

भारताशी नेहमी स्पर्धा करु पाहणा-या पाकिस्तानने आता अटारी सीमेवरील तिरंग्यापेक्षा उंज ध्वज उभारण्याचा निर्णय घेतला आहे

ऑनलाइन लोकमत

अमृतसर, दि. 7 - भारताशी नेहमी स्पर्धा करु पाहणा-या पाकिस्तानने आता भारतापेक्षा उंज ध्वज उभारण्याचा निर्णय घेतला आहे. वाघा बॉर्डरवर 400 फूट उंच ध्वजस्तंभावर पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यात येणार आहे. मार्च महिन्यात भारताकडून भारत-पाकिस्तानच्या पंजाबमधील अटारी सीमेवर येथे एक मोठा तिरंगा झेंडा फडकविण्यात आला होता. या ध्वजस्तंभाची उंची ११० मीटर (३६० फूट), रुंदी २४ मीटर आणि वजन ५५ टन आहे. भारताने ध्वज उभारल्यानंतर पाकिस्तानमध्ये अस्वस्थता पसरली होती. इतकंच नाही तर भारत हेरगिरी करत असल्याचा आरोप करत कांगावा करण्यासही सुरुवात केली होती.

आणखी वाचा - 

अटारी सीमेवर सर्वांत मोठा तिरंगा

अटारी बॉर्डरवर सर्वांत उंच राष्ट्रध्वज, पाकिस्तानचा हेरगिरीचा कांगावा

राज्यातील सर्वात उंच ध्वजस्तंभाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

 

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सरकारने ध्वजस्तंभ उभा करण्याच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. ज्या ठिकाणी ध्वजस्तंभ उभा करण्यात येणार आहे तेथील झाडे कापली जात आहेत. जर का सर्व काही नियोजनप्रमाणे पार पडलं तर हा जगातील आठवा सर्वात उंच ध्वज असेल. 

 

याचवर्षी 5 मे रोजी भारताने 360 फूटावर तिरंगा उभारतला, मात्र जोरात वाहणा-या वा-यामुळे काही दिवसातच तो फाटला होता, ज्यामुळे तो बदलावा लागला होता. तिरंग्याची काळजी घेताना अधिका-यांना अनेक समस्या जाणवत आहेत. आतापर्यंत पाचवेळा तिरंगा बदलावा लागला आहे. ध्वजस्तंभालाही अद्याप तिरंग्याचा रंग देण्यात आलेला नाही. भारत - पाकिस्तान सीमारेषेवर बीटिंग रीट्रीट कार्यक्रमादरम्यान तिरंगा खाली पडल्याने भारतीय अधिका-यांची अडचण झाली होती.

 

वाघा बॉर्डरवर ध्वज उभारण्याच्या निर्णयामागे मानसिकतेशिवाय दुसरं कारण असू शकत नाही. भारताने अटारी सीमेवर उभा केलेला ध्वज लाहोरमधूनही दिसत असल्याने पाकिस्तानी अधिका-यांना जनतेमधील आपली प्रतिष्ठा कमी झाल्याचं वाटत असावं. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला असावा", असं बीएसएफचे माजी अधिकारी डी एश सारन बोलले आहेत. यामागे कोणतंही दुसरं कारण असल्याची शक्यता त्यांनी नाकारली आहे.

 

अटारी सीमेवर सर्वांत मोठा तिरंगा

मार्च महिन्यात भारत-पाकिस्तानच्या पंजाबमधील अटारी सीमेवर येथे एक मोठा तिरंगा झेंडा फडकविण्यात आला. हा देशातील सर्वांत मोठा तिरंगा असल्याचे सांगितले जाते. या ध्वजस्तंभाची उंची ११० मीटर (३६० फूट), रुंदी २४ मीटर आणि वजन ५५ टन आहे. रांचीतील ९१.४४ मीटर (३०० फूट) उंच ध्वज स्तंभाला या ध्वजाने मागे टाकले. सीमेपासून १५० मीटर अंतरावर हा झेंडा स्थापन करण्यात आला आहे. सूर्यास्ताच्या वेळी येथे जमणाऱ्या हजारो पर्यटकांसाठी हा झेंडा आकर्षणाचे केंद्र बनला आहे. पंजाब सरकारच्या अमृतसर सुधार न्यास प्राधिकरणाने ३.५० कोटी रुपये खर्च करून ही योजना आकाराला आणली. हा भारतीय ध्वज इतका उंच आहे की तो पाकिस्तानातील लाहोर शहरातूनही सहजपणे दिसू शकेल, असे सांगण्यात आले होते.