ऑनलाइन लोकमतफ्रॅन्कफुर्ट, दि. 8 - उत्तर जर्मनीमधील हॅनोव्हर शहरात आढळलेल्या द्वितीय विश्वयुद्धातील पाच हवाई बॉम्बना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रशासनाने शहर रिकामे केले. सुमारे ५0 हजार नागरिकांना शहर सोडावे लागले. द्वितीय विश्वयुद्धात जर्मनीवर विमानातून बॉम्बचा प्रचंड मारा झाला होता. एका बांधकाम जागेवर दोन बॉम्ब सापडले. आणखी तपास केला असता जवळच तीन बॉम्ब आढळून आले.
दुसऱ्या महायुद्धातील पाच हवाई बॉम्ब आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2017 02:37 IST