शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या ‘एव्हरेस्ट’वीर महिलेचे निधन

By admin | Updated: October 23, 2016 03:58 IST

जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला आणि जपानी गिर्यारोहक जुन्को ताबेई यांचे आजाराने निधन झाले. त्या ७७ वर्षांच्या होत्या.

टोकियो : जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला आणि जपानी गिर्यारोहक जुन्को ताबेई यांचे आजाराने निधन झाले. त्या ७७ वर्षांच्या होत्या. ताबेई यांनी मे १९७५मध्ये एव्हरेस्ट सर केले होते. तेव्हा त्या ३५ वर्षांच्या होत्या. त्यानंतर १९९२पर्यंत त्यांनी एकापाठोपाठ जगातील सर्वांत उंच ७ शिखरांना गवसणी घातली. त्या जठराच्या कर्करोगाने पीडित होत्या. साईतामा येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २०११च्या भूकंप आणि त्सुनामीची झळ बसलेल्या शालेय विद्यार्थ्यांना सोबत घेऊन त्यांनी गेल्या जुलैत माऊंट फुजी हे शिखर सर केले होते. हे त्यांचे अखेरचे गिर्यारोहण ठरले. ताबेई मूळच्या फुकुशिमा परगण्यातील आहेत. २०११च्या आपत्तीत याच परगण्याची अपरिमित हानी झाली होती. माऊंट एव्हरेस्टच्या चढाईदरम्यान हिमस्खलन होऊन त्या बर्फाखाली गाडल्या गेल्या होत्या. मात्र, एका गाईडने बर्फाखालून सुखरूप बाहेर काढल्यानंतर त्यांनी चढाई सुरू ठेवली. त्यानंतर १२ दिवसांनी शिखरावर पोहोचत एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिली महिला होण्याचा मान त्यांनी पटकावला. एव्हरेस्ट सर केल्यानंतर जागतिक स्तरावर त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. मात्र, माझ्या आधी ३६ लोकांनी एव्हरेस्ट सर केल्याचे सांगून त्या या गोष्टीला महत्त्व देणे टाळायच्या. ७ खंडांतील ७ सर्वोच्च शिखरे सर करणाऱ्या पहिल्या महिला बनण्याचा मानही त्यांनी मिळविला. त्यांनी ६० हून अधिक देशांत गिर्यारोहण केले. चार वर्षांपूर्वी त्यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. तथापि, त्यानंतरही त्यांनी गिर्यारोहणात खंड पडू दिला नाही.