शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सौदीत महिलांसाठी पहिले कार शोरूम; कर्मचारीही महिलाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 02:13 IST

मागील वर्षाच्या अखेरीस सौदी अरेबियाचे राजे सलमान यांनी महिलांना कार चालविण्याचा अधिकार दिल्यानंतर, पाचच महिन्यांनी येथे एका खासगी कंपनीने महिलांसाठी कार शोरूम सुरू केले आहे. पश्चिम लाल सागराच्या बेटानजीक एका शॉपिंग मॉलमध्ये हे शोरूम सुरू करण्यात आले आहे.

जेद्दाह : मागील वर्षाच्या अखेरीस सौदी अरेबियाचे राजे सलमान यांनी महिलांना कार चालविण्याचा अधिकार दिल्यानंतर, पाचच महिन्यांनी येथे एका खासगी कंपनीने महिलांसाठी कार शोरूम सुरू केले आहे. पश्चिम लाल सागराच्या बेटानजीक एका शॉपिंगमॉलमध्ये हे शोरूम सुरू करण्यात आले आहे.ते शोरूम केवळ महिलांकडून चालविण्यात येत आहे. त्यामुळे येथील सर्व कर्मचारी महिला आहेत. देशात महिलांसाठी आणखी शोरूम सुरू करण्याचा विचार ही कंपनी करत आहे.महिलांना ड्रायव्हिंग करण्यावरील बंदी हटविण्यात येत असल्याची घोषणा सौदी अरेबियाने सप्टेंबरमध्ये केली होती. त्या आधी राजधानी रियाधमध्ये कार चालविण्याचा प्रयत्न करणाºया महिलांना १९९० मध्ये अटक करण्यात आली होती.आता महिलांना लायसन्स जारी करण्याचे काम जूनमध्ये सुरू करण्यात येणार आहे. काही कामानिमित्त बाहेर जाणे किंवा शाळेतील मुलांना नेण्या-आणण्यासाठी या महिलांना कारहा मोठा आधार होणार आहे.यापूर्वी कारमधून बाहेर जाण्यासाठी त्यांना नातेवाईक, घरातीलपुरुषांवर अवलंबून राहावे लागत होते. (वृत्तसंस्था)मनाल अल-शरीफ या महिलेने कार चालविण्यास असलेल्या बंदीविरुद्ध संघर्ष केला आहे. ही महिला म्हणते की, आम्ही महिलांनी गप्प राहून चालणार नाही. ‘डेअरिंग टू ड्राइव्ह’ही तिची मोहीम आहे. तिने २०११ मध्ये ड्रायव्हिंग करून त्याचा व्हिडीओ यू ट्यूबवर पोस्ट केल्यामुळे तिला अटक करण्यात आली होती. तिच्या या मोहिमेला व संघर्षाला आता यश आले असून, महिलांना कार चालविण्यास परवानगी मिळाल्यानंतर फक्त महिलांचे कार शोरूम हे पुढचे पाऊल समजले जात आहे.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय