शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

चीनने बांधली पहिली विमानवाहू युद्धनौका

By admin | Updated: April 27, 2017 01:16 IST

साता समुद्रापलीकडेही दबदबा निर्माण करणारे नौदल उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा एक भाग म्हणून चीनने पूर्णपणे देशी

बिजिंग : साता समुद्रापलीकडेही दबदबा निर्माण करणारे नौदल उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा एक भाग म्हणून चीनने पूर्णपणे देशी बनावटीच्या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेचे जलावतरण केले. अशा प्रकारे पूर्णपणे स्वत:च्या ताकदीवर विमानवाहू युद्धनौका बांधणारा चीन हा जगातील सातवा देश ठरला आहे.उत्तरेकडील दालियान बंदरातील नौकाबांधणी आवारात ही युद्धनौका बांधली गेली. बुधवारी सकाळी वरिष्ठ नौदल आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत औपचारिक समारंभ झाल्यानंतर या युद्धनौकेने बर्थ सोडून प्रथमच समुद्रात प्रस्थान केले.चीनच्या संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार ‘००१ए’ या प्रकारातील ही विमानवाहू युद्धनौका ५० हजार टनांची आहे. तिचे आरेखन सन २०१३ मध्ये व प्रत्यक्ष बांधणी सन २०१५ मध्ये सुरु झाली होती. सागरी चाचण्या पूर्ण झाल्यावर आणि त्यावरील सर्व प्रकारची लढाऊ विमाने उपलब्ध झाल्यानंतर ही विमानवाहू युद्धनौका सन २०२० पूर्वी नौदलाच्या सक्रिय सेवेत दाखल होईल, अशी अपेक्षा आहे.या नव्या युद्धनौकेचे नाव अद्याप अधिकृतपणे ठरलेले नाही. परंतु तिचा स्थायी मुक्काम शॅन्डाँग प्रांतातील क्विंगदाओ नौदल तळावर राहणार असल्याने कदाचित तिचे नाव ‘शॅन्डाँग’ ठेवले जाईल, अशी अटकळ चिनी प्रसिद्धीमाध्यमांत वर्तविण्यात आली आहे. सन २०२० पर्यंत नौदलाचा झपाट्याने विस्तार करून युद्धनौका, पाणबुड्या व रसद पुरविणाऱ्या नौका असा मिळून एकूण २६५ ते २७३ युद्धनौकांचा बलाढ्य ताफा उभा करण्याची चीनची महत्वाकांक्षी योजना आहे. यात चीन देशी बनावटीच्या आणखी दोन ते तीन विमानवाहू युद्धनौकाही बांधेल, असे समजते. या कामगिरीने हा कम्युनिस्ट देश अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, इटली आणि स्पेन या निवडक देशांच्या पंक्तींत पोहोचणार आहे. (वृत्तसंस्था)