शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
6
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
7
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
10
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
11
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
12
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
13
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
14
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
15
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
16
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
17
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
18
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
19
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
20
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात

ट्रेनमध्ये गोळीबाराचा थरार

By admin | Updated: August 23, 2015 05:22 IST

अ‍ॅम्स्टरडमहून पॅरिसला जाणाऱ्या एका हायस्पीड रेल्वेत शुक्रवारी रात्री काही सेकंद गोळीबार झाला आणि काही कळण्याच्या आतच धावपळ उडाली. अमेरिकेच्या दोन नागरिकांनी गोळीबार

अराज : अ‍ॅम्स्टरडमहून पॅरिसला जाणाऱ्या एका हायस्पीड रेल्वेत शुक्रवारी रात्री काही सेकंद गोळीबार झाला आणि काही कळण्याच्या आतच धावपळ उडाली. अमेरिकेच्या दोन नागरिकांनी गोळीबार करणाऱ्या मोरोक्कोच्या २६ वर्षीय तरुणाला पकडले आणि अनर्थ टळला. काही मिनिटातच घडलेल्या या घटनेने रेल्वेतील ५५० प्रवाशांच्या काळजाचा ठोका मात्र चुकविला. दरम्यान, या झटापटीत तीन प्रवासी जखमी झाले असून यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. अगदी कल्पनेनेही अंगावर काटा उभा करणाऱ्या या घटनेची माहिती अशी की, ही रेल्वे शुक्रवारी रात्री अ‍ॅम्स्टरडमहून पॅरिसला निघाली. अमेरिकी सैन्याचे सदस्य असलेले २२ वर्षीय अलेक स्कार्लाटोस आणि स्पेन्सर स्टोन हे या रेल्वेतून प्रवास करत होते. स्कार्लाटोस याने सांगितले की, एका गार्डला त्यांनी पळताना पाहिले आणि नेमके काय होत आहे हे कळायच्या आतच गोळीबाराचा आवाजही आला. गार्डपाठोपाठ स्कार्लाटोसचा सहकारी स्पेन्सर हा आवाजाच्या दिशेने धावला. एव्हाना रेल्वेतील प्रवाशांना काही तरी अघटित घडत असल्याची कल्पना आली होती. काही सेकंदासाठी झालेल्या या धावपळीत स्पेन्सरने अक्षरश: मोरोक्कोच्या त्या युवकाकडे झेप घेतली आणि त्याच्या हातातील बंदूक हिसकावली. तोपर्यंत या युवकाने स्पेन्सरवर चाकूहल्ला चढविला. या सर्व झटापटीत स्पेन्सरने या तरुणाला पकडण्यात यश मिळविले. स्कार्लाटोस सांगतो की,अगदी गोळीबार सुरू असतानाही स्पेन्सरने हिंमत करून थेट त्या युवकाच्या दिशेने झेप घेतली. जर गोळी कुणाला लागलीच असती तर तो स्पेन्सरच असला असता, पण सुदैवाने असे काही झाले नाही. या घटनेनंतर या तरुणाला अटकही करण्यात आली आहे. माझी बंदूक परत द्या हो...रेल्वेत मोरोक्कोच्या बंदूकधारी तरुणाला पकडल्यानंतर त्याच्याकडून बंदूक हस्तगत करण्यात आली. त्यानंतरही माझी बंदूक परत द्या हो, अशी विनवणी तो करत होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. (वृत्तसंस्था)- पॅरिसमध्ये जानेवारीत एका बंदूकधारी इसमाने १७ जणांची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच रेल्वेतील या गोळीबाराच्या घटनेने भीतीची छाया गडद झाली आहे. दरम्यान, बंदूक घेऊन रेल्वेत प्रवेश मिळविणाऱ्या या तरुणाबद्दलचे गूढ वाढले असून मोरोक्कोच्या या युवकाचा आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी काही संबंध आहे का आदी बाबी तपासून पाहिल्या जात आहेत. अमेरिकन सैन्याच्या दोन जवानांनी या तरुणाला पकडून मोठी दुर्घटना टाळल्याने या जवानांना शौर्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.