शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

अमेरिकेत पोलिसांवर गोळीबार; पाच ठार

By admin | Updated: July 9, 2016 02:45 IST

अमेरिकेत आंदोलनादरम्यान काहींनी पोलिसांवर केलेल्या गोळीबारात पाच अधिकारी ठार, तर सात जखमी झाले. डलास शहरात गुरुवारी रात्री करण्यात आलेला हा हल्ला देशातील

ह्युस्टन : अमेरिकेत आंदोलनादरम्यान काहींनी पोलिसांवर केलेल्या गोळीबारात पाच अधिकारी ठार, तर सात जखमी झाले. डलास शहरात गुरुवारी रात्री करण्यात आलेला हा हल्ला देशातील पोलिसांवरचा आजवरचा सर्वांत घातक हल्ला ठरला. पोलिसांनी कृष्णवर्णीयांवर अलीकडेच गोळीबार केला होता. त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू होते. शहराच्या मध्यवर्ती भागात पोलिसांना लक्ष्य करण्यात आले. दोन बंदूकधारी उंच ठिकाणी दबा धरून बसले होते. त्यांनी हल्ला केला, असे डलासचे पोलीस प्रमुख डेव्हिड ब्राऊन यांनी येथे सांगितले. पोलिसांनी एका संशयिताशी वाटाघाटीचा प्रयत्न केला. तथापि, हा प्रयत्न फोल ठरला. त्यानंतर झालेल्या चकमकीत हा संशयित मारला गेला, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सीएनएन या वाहिनीला सांगितले. मात्र, तो नेमका कसा ठार झाला हे स्पष्ट केले नाही. उपाहारगृहे असलेल्या वर्दळीच्या भागात बॉम्ब पेरण्यात आल्याची धमकी संशयितांनी दिली होती. वाटाघाटी सुरू असताना एका संशयिताने त्यांचा (पोलिसांचा) शेवट जवळ आलेला आहे. गॅरेज तसेच शहराच्या मध्यवर्ती भागात अनेक ठिकाणी बॉम्ब पेरले असल्याचे म्हटले होते. या संशयिताचे आणखी काही जोडीदार असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे ब्राऊन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सर्व संशयित एकमेकांच्या संपर्कात होते, असे मानून पोलीस अधिकारी तपास करीत आहेत. पोलिसांसोबत झालेल्या चकमकीनंतर एका संशयिताला काल रात्री अटक करण्यात आली होती. त्याच्या जवळ संशयास्पद पाकीट आढळले असून, ते बॉम्बशोधक व नाशक पथकाने ताब्यात घेतले आहे. गोळीबाराच्या घटना थांबत नसल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना घटनेबाबत माहिती देण्यात आली. ओबामा नाटो परिषदेसाठी वॉरसा येथे आहेत. त्यांनी डलासमधील हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. पोलीस अधिकाऱ्यांना अनेक संशयितांकडून लक्ष्य केले जात असून हा प्रकार निदंनीय आहे, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)का झाला हा गोळीबार?गेल्या चार दिवसांत अमेरिकेत दोन कृष्णवर्णीय तरुणांना तेथील पोलिसांनी कोणत्याही कारणांविना गोळ्या घालून ठार मारले. त्याच्या निषेधार्थ गौर व कृष्णवर्णीय लोकांनी गुरुवारी संध्याकाळी मोर्चा काढला. त्या मोर्चातील काहींनी अचानकपणे पोलिसांवर गोळीबार केला.