शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

कॅनडात इस्लामिक सेंटरमध्ये गोळीबार, ६ ठार, ८ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2017 00:45 IST

कॅनडाततील एका बंदूकधाऱ्याने क्युबेक सिटीतील इस्लामिक कल्चरल सेंटरमध्ये रविवारी रात्री उशिरा केलेल्या गोळीबारात सहा जण ठार तर आठ जण जखमी झाले.

क्युबेक सिटी : कॅनडाततील एका बंदूकधाऱ्याने क्युबेक सिटीतील इस्लामिक कल्चरल सेंटरमध्ये रविवारी रात्री उशिरा केलेल्या गोळीबारात सहा जण ठार तर आठ जण जखमी झाले. क्युबेक पोलिसांचे प्रवक्ते ख्रिस्तीन कौलोंब यांनी या गोळीबार प्रकरणी दोन संशयितांना अटक केल्याचे सांगितले. तिसरा संशयित फरार असल्याची शक्यता त्यांना वाटत आहे. हल्ल्यामागील नेमके कारण मात्र समजलेले नाही. रात्री आठ नंतर गोळीबार झाला त्यावेळी काही डझन लोक या सेंटरमध्ये होते, असे सीबीसीने वृत्त दिले. मशिदीत सायंकाळची प्रार्थना झाल्यानंतर हल्ला झाला. मशिदीमध्ये चेहरा झाकलेले दोन लोक शिरले व त्यांनी गोळीबार सुरू केला, असे साक्षीदाराच्या हवाल्याने रेडिओ-कॅनडाने वृत्त दिले. हा हल्ला दहशतवाद्यांनी केला असल्याचे कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रुदेऊ यांनी सोमवारी म्हटले. प्रार्थनास्थळी आणि निर्वासितांच्या केंद्रावरील या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो, असे त्रुदेऊ यांनी निवेदनात म्हटले. मुस्लीम-कॅनेडियन हे आमच्या राष्ट्रीय एकात्मतेचा महत्वाचा भाग आहेत. अशा स्वरुपाच्या हिंसाचाराला आमच्या समाजात, शहरात व देशात कोणतीही जागा नाही, असे त्रुदेऊ म्हणाले. रात्री ७.१५ च्या सुमारास चेहरे झाकलेले दोन बंदूकधारी या केंद्रात शिरले. ठार झालेले ३५ ते ७० या वयोगटातील आहेत. त्रुदेऊ यांनी मुस्लीम आणि निर्वासितांचे कॅनडामध्ये स्वागत आहे, असे म्हटल्यानंतर हल्ला झाला. (वृत्तसंस्था)