शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

‘इसिस’च्या जॉनला शोधा

By admin | Updated: October 6, 2014 00:12 IST

इस्लामिक स्टेट आयएसचा घातक सदस्य जिहादी जॉन याचा शोध घ्यावा, असे आदेश ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी आपल्या गुप्तचर प्रमुखाला दिले आहेत

लंडन : इस्लामिक स्टेट आयएसचा घातक सदस्य जिहादी जॉन याचा शोध घ्यावा, असे आदेश ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी आपल्या गुप्तचर प्रमुखाला दिले आहेत. जिहादी जॉन याने नुकतीच ओलीस ब्रिटिश नागरिक अ‍ॅलन हेनिंग याची हत्या केली असून, तसा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. जॉनचा पत्ता लागल्यास त्याला पकडण्यासाठी वा मारण्यासाठी विशेष दल पाठविण्याची ब्रिटनची योजना आहे. ब्रिटिश मदत कार्यकर्ता अ‍ॅलन हेनिंगच्या मारेकऱ्याचा शोध घेण्याची मोहीम अधिक वेगवान करण्यात आली आहे, आयएसने प्रसिद्ध केलेल्या चित्रफितीत जिहादी जॉन हेनिंग याचा शिरच्छेद करताना दिसत आहे. संडे टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार कॅमेरून यांनी शनिवारी गुप्तचर संघटना एमआय, एमआय ६ व जीसीएचक्यू यांना चेकर्स रिट्रिट येथे बोलावले व आयएसच्या मारेकऱ्याचा शोध घेण्याचे आदेश दिले. अ‍ॅलन हेनिंग (४७) चा शिरच्छेद करणारा दहशतवादी जॉन जिहादी हाही ब्रिटिशच आहे. हेनिंगच्या हत्येची चित्रफीत जारी झाल्यानंतर १२ तासांनी ही बैठक घेण्यात आली. सेलफोर्ड येथे राहणारा हेनिंग टॅक्सीचालक होता. हेनिंगचा मेहुणा कोलीन लिवसे व त्याच्या एका मित्राने सरकारने अ‍ॅलनला वाचविण्यासाठी काहीही केले नाही असा आरोप केला आहे. तर हेनिंगची विधवा पत्नी बार्बराने या हत्येमुळे कुटुंब अत्यंत दु:खी असल्याचे म्हटले असून, तिने हेनिंगच्या सुटकेसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. हेनिंगचे अपहरण २६ डिसेंबरला झाले होते. त्यावेळी आयएस सदस्य सिरियात प्रवेश करत होते. (वृत्तसंस्था)