शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

अखेर ब्रिटन स्वतंत्र

By admin | Updated: June 25, 2016 04:16 IST

जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा जनमताद्वारे घेतलेला निर्णय म्हणजे ब्रिटनला मिळालेले स्वांतत्र्यच मानले जात आहे.

मुंबई : जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा जनमताद्वारे घेतलेला निर्णय म्हणजे ब्रिटनला मिळालेले स्वांतत्र्यच मानले जात आहे. मात्र जनमताचा कौल कळताच जगभरात अर्थकंप झाला. भारतीय शेअर बाजार दणक्यात आपटले, रुपया घसरला आणि सोन्याच्या किमतीत २,000 रुपयांनी वाढ झाली. शेअर बाजार आणि रुपयाच्या पडझडीतून भारतीय अर्थव्यवस्थेलाही काही झटके बसले असले, तरी या घटनेचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम तत्कालिक असून, भविष्याचा विचार करता ही घटना भारतीय अर्थकारणाच्या पथ्यावर पडणार असल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. शुक्रवारी सकाळी शेअर बाजाराच्या निर्देशांकात एक हजार अंशांचा गडगडाट झाला आणि गुंतवणूकदारांचे १.७९ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. ३० सर्वोत्तम (पान १० वर)मान्सूनवर भिस्तब्रेक्झिटमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम होणार नसल्याचे भाकीत अनेक अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. यंदा मान्सून चांगला झाल्यास विकासाच्या प्रक्रियेला आणखी वेग मिळेल, जागतिक अर्थकारणाच्या अस्थिरतेच्या सावटातून भारत बाहेर पडले, असे मत आर्थिक वर्तुळात आहे. शेअर खरेदीस उत्तम काळशेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्समध्ये एक हजार अंशांची घसरण झाली. दुपारी सेन्सेक्स सावरला असला तरी दिवसभर पडझडीचा ट्रेन्ड कायम होता. अनेक उत्तम कंपन्यांच्या समभागांमध्ये लक्षणीय घसरण झाली. या घसरणीमुळे अनेक उत्तम समभाग आकर्षक किमतीला उपलब्ध झाले आहेत.रुपया घसरला; डॉलर महागलाब्रेक्झिटचे वृत्त आल्यानंतर जगभरातील चलनांच्या किमतीत मोठी घसरण दिसली. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या मूल्यात एक टक्क्याची घसरण झाली आणि रुपयाने ६८ रुपये १५ पैशाच्या पातळीला स्पर्श केला. देशात इंधनापासून विविध प्रकारच्या सुमारे ६७ जीवनावश्यक गोष्टी आयात केल्या जातात. त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य वाढले तर आयातीचा खर्च वाढतो. परिणामी त्या वस्तूंचे भाव वाढताना दिसतात. ब्रिटनचे आता पुढे काय ?ब्रिटिश जनतेने सार्वमतातून युरोपियन संघाशी काडीमोड घेण्याचा कौल दिला आहे. आता ही प्रक्रिया २००९ च्या लिस्बन करारातील कलम ५० नुसार होईल. १९८२ नंतर पहिल्यांदाच या कलमाचा वापर केला जाईल.लिस्बन करारातील कलम ५० मधील तरतुदीतहत युरोपीय संघातील सर्व सदस्य देशांना वाटाघाटीसाठी दोन वर्षांचा कालावधी असतो. वाटाघाटीचा कालावधी वाढविताही येऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते ही प्रक्रिया २०२० पर्यंत पूर्ण होईल. युरोपियन संघाचे विद्यमान आयुक्त आणि शक्यतो ब्रिटनच्या नवीन पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात वाटाघाटी होतील.