शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

‘तुमच्या देशात चालते व्हा,’ म्हणत भारतीयावर गोळीबार

By admin | Updated: March 6, 2017 06:18 IST

एका भारतीय व्यावसायिकावर झालेल्या हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी केंट येथे एका शीख बांधवावर गोळीबार झाला

न्यूयॉर्क : अमेरिकत गेलेल्या भारतीयांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले असून, एका भारतीय व्यावसायिकावर झालेल्या हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी केंट येथे एका शीख बांधवावर गोळीबार झाला. ‘तुमच्या देशात चालते व्हा,’ म्हणत एका माथेफिरूने त्याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात दीप राय (३९) हे जखमी झाले. दीप राय हे शुक्रवारी वॉशिंग्टन प्रांताच्या केंटमध्ये आपल्या घराबाहेर वाहनाची दुरुस्ती करत होते. याच वेळी चेहरा झाकलेला एक व्यक्ती तिथे आला आणि दीप राय यांच्यावर गोळीबार केला. केंट पोलिसांनी तपास सुरू केला असून, या संदर्भात एफबीआय आणि इतर तपास संस्थांची मदत घेतली जाणार आहे. भारतीय आमच्यासाठी मौल्यवान भारतीय आमच्यासाठी मौल्यवान आहेत. कान्सासमध्ये आम्ही त्यांचे स्वागत करतो, असे मत कान्सासचे राज्यपाल सॅम ब्रॉनबॅक यांनी व्यक्त केले आहे. भारतीय समुदायाच्या सदस्यांशी बोलताना ते म्हणाले की, एका व्यक्तीने द्वेषातून केलेले हे कृत्य आहे. मागील आठवड्यात भारतीय इंजिनीअर श्रीनिवास कुचीभोटला यांची हत्या झाली होती, या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. श्रीनिवास यांच्या हत्येनंतर भारतीय समुदायासह अन्य वर्गातूनही संताप व्यक्त होत आहे. (वृत्तसंस्था)