शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

न्यूझीलंडच्या संसदेत महिला खासदाराने दाखवला स्वत:चा न्यूड फोटो; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 22:35 IST

लॉरा यांनी डिपफेक डिजिटल हार्म अँन्ड एक्सप्लॉइटेशन विधेयकाचे समर्थन केले. १४ मे रोजी लॉरा यांनी केलेले भाषण सध्या व्हायरल होत आहे.

सध्याच्या युगात Artificial Intelligence म्हणजे एआय वेगाने पुढे येत आहे. त्यात न्यूझीलंडमध्ये महिला खासदार लॉरा मॅक्लर यांनी संसदेत स्वत:चा AI जनरेटेड न्यूड फोटो दाखवला. असे बनावट फोटो बनवणे किती सोपे आणि धोकादायक ठरू शकते हे त्यांनी उपस्थितांना सांगत हा फोटो गुगल सर्चद्वारे वेबसाईटचा वापर करून काहीच मिनिटांत डिपफेक बनवला असून डिपफेक आणि AI ला नियंत्रित करण्यासाठी कायदा आणण्याची मागणी त्यांनी केली.

संसदेत लॉरा मॅक्लर म्हणाल्या की, हा माझा न्यूड फोटो आहे, परंतु तो खरा नाही. मला हा डिपफेक फोटो बनवण्यासाठी ५ मिनिटांहून कमी वेळ लागला. समस्या तंत्रज्ञानाची नाही परंतु त्याचा गैरवापर करून लोकांनी त्रास देण्यात आहे. त्यावर आपल्याला तोडगा काढावा लागेल. न्यूझीलंडमध्ये डिपफेकबाबत कुठलाही कायदा नाही परंतु डिजिटल प्रसाराबाबत काही नियम आहेत. लॉरा यांनी डिपफेक डिजिटल हार्म अँन्ड एक्सप्लॉइटेशन विधेयकाचे समर्थन केले. १४ मे रोजी लॉरा यांनी केलेले भाषण सध्या व्हायरल होत आहे.

बहुतांश डिपफेक पॉर्न विना सहमती बनवले जातात. त्याचा बळी महिला पडतात असं न्यूझीलंडमधील तज्ज्ञांनी म्हटलं. कुणीही विना सहमती डिपफेक पॉर्नचे टार्गेट बनू नये. हा उघडपणे छळ आहे. आपल्या कायद्यात लवकरात लवकर सुधारणा करण्याची गरज आहे. डिपफेक बनवण्यासाठी तुम्हाला केवळ एका बॉक्समध्ये क्लिक करण्यास सांगितले जाते. तुम्ही १८ वर्षावरील आहात, फोटोमधील व्यक्तीची सहमती तुमच्याकडे आहे का हेच विचारले जाते. अनेक प्रकरणात सहमती घेतली जात नाही. ९० टक्के महिलांच्या फोटोचा चुकीचा वापर केला जातो असंही लॉरा यांनी संसदेत सांगितले.

दरम्यान,  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मे महिन्यात टेक इट डाउन कायद्यावर स्वाक्षरी केली, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या संमतीशिवाय त्याचा फोटो वापरणे गुन्हा ठरेल. या नियमानुसार, पीडितेच्या विनंतीनुसार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना ४८ तासांच्या आत असे फोटो काढून टाकावे लागतील. भारतातही नोव्हेंबर २०२४ मध्ये अभिनेत्री रश्मिका मंदाना डिपफेक व्हिडिओचा शिकार झाली होती. रश्मिकाचा फेक व्हिडिओ सोशल मीडियात बराच व्हायरल झाला होता. 

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सSocial Viralसोशल व्हायरल