शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत पुन्हा गोळीबार, अनेक जण जखमी झाल्याची भीती

By admin | Updated: June 14, 2017 23:51 IST

अमेरिकेतल्या यूपीएस व्हेअरहाऊस आणि ग्राहक सेवा केंद्रामध्ये अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमतसन फ्रान्सिस्को, दि. 14 - अमेरिकेतल्या यूपीएस व्हेअरहाऊस आणि ग्राहक सेवा केंद्रामध्ये अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. मात्र लोकल मीडिया रिपोर्टनुसार गोळीबारात अनेक जखमी झाले आहेत. गोळीबाराच्या घटनेमुळे पोलिसांनी आजूबाजूचा परिसर बंद केला आहे. सन फ्रान्सिस्कोमधल्या पोर्टेरो हिल 2.5 मैलांवर ही गोळीबाराची घटना घडली आहे. पोलिसांनी गोळीबार झालेल्या परिसरात जाण्यास मनाई केली आहे. लोकल मीडिया रिपोर्टनुसार गोळीबार करणा-याला ठार करण्यात आलं असून, अनेक नागरिक गोळीबारात जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. (अमेरिकेत अंदाधुंद गोळीबार, हल्लेखोराचा मृत्यू)तत्पूर्वी अमेरिकेच्या व्हर्जिनियामध्ये काँग्रेसच्या एका ज्येष्ठ खासदारावर गोळीबार करणा-याचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्टीव्ह स्कॅलीस यांच्यावर बंदुकधारी हल्लेखोराने गोळीबार केला होता. या गोळीबारात स्टिव्ह स्कॅलिस यांच्यासह 5 जण गंभीर जखमी झाले असून, उपचारादरम्यान स्कॅलिस यांना जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे.   प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात रिपब्लिकन पार्टीच्या नेत्यासह किमान 5 जण गंभीर जखमी झाले होते.  फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, वॉशिंग्टनजवळील उपनगरात अमेरिकी काँग्रेसमधील सदस्यांमध्ये बेसबॉलचा सामना होणार आहे. दरवर्षी अशा स्वरुपाचा सामन्याचे आयोजन केले जाते आणि या सामन्यासाठी बुधवारी सकाळी व्हर्जिनियामध्ये सराव सुरू होता. सरावासाठी अमेरिकी काँग्रेसमधील रिपब्लिकन सदस्य स्टिव्ह स्कॅलिस आणि अन्य मंडळी उपस्थित होती. अचानक एका व्यक्तीने अंदाधुंद गोळीबाराला सुरूवात केली. ‘स्कॅलिस यांना नीट चालताही येत नव्हतं. घटनास्थळावरुन बाहेर पडतानाही त्यांना त्रास होत होता’ असं अमेरिकी काँग्रेसमधील मॉ ब्रुक्स यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितलं.