ऑनलाइन लोकमतवॉशिंग्टन, दि. 21 - अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियानं केलेल्या हस्तक्षेपाची चौकशी आता अमेरिकेची संस्था फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (FBI) करणार आहे. एजन्सीचे संचालक जेम्स कॉम यांनी सोमवारी यांचे संकेत दिलेत. ते म्हणाले, एफबीआय अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील निकालांना प्रभावित करण्यासाठी रशियाच्या भूमिकेची चौकशी करणार आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक अभियान आणि रशियाच्या पुतिन सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध असल्यास एफबीआय त्याची चौकशी करणार आहे. मात्र अपवादात्मक परिस्थितीत कधी कधी एफबीआयला असं करावं लागतं. जेव्हा एखादा मुद्दा राष्ट्रीय हिताशी जोडलेला असेल त्यावेळी आम्हाला तो सार्वजनिक करावाच लागतो. एजन्सी चौकशीसंबंधी कधीच जाहीररीत्या सांगत नाही.ओबामा प्रशासनानं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियानं हस्तक्षेप करत डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्यासह त्यांच्या समर्थक संगणकात घुसखोरी केली होती. त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला होता. रशियावर डेमोक्रॅटिक पक्षाचे संगणक हॅक करणे आणि हिलरी यांचे इमेल्स लीक करण्यासारखे गंभीर आरोप आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी यात अनेक नव्या गोष्टी उघड झाल्या होत्या. अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांची टीम पुतिन प्रशासनाच्या काही अधिका-यांच्या संपर्कात होते. याचदरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावरील व्यक्तीने करू नये ते केलेले आढळल्याने अखेर फ्लिन यांना पायउतार व्हावे लागले. अवघ्या 13 दिवसांत ट्रम्प यांच्यावर आपली एक महत्त्वाची नेमणूक माघारी घेण्याची वेळ आली. मात्र या चौकशी प्रकरणात एफबीआयच्या केंद्रस्थानी नक्कीच डोनाल्ड ट्रम्प राहणार आहेत.
ट्रम्प आणि पुतिन यांच्या संबंधांची एफबीआय करणार चौकशी
By admin | Updated: March 21, 2017 11:13 IST