शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

इसिसनं उडवली मोसुलमधील प्रसिद्ध नूरी मस्जिद

By admin | Updated: June 22, 2017 09:44 IST

दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटनं (ISIS) मोसुलमधील प्रसिद्ध अल-नूरी मस्जिद बुधवारी स्फोट घडवून उडवली.

 ऑनलाइन लोकमत

बगदाद, दि. 22 - दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटनं (ISIS) मोसुलमधील प्रसिद्ध अल-नूरी मस्जिद बुधवारी स्फोट घडवून उडवली.  ISIS नेता अबू बकर अल बगदादी 2014 मध्ये या मस्जिदच्या माध्यमातून पहिल्यांदा लोकांसमोर आला होता व त्यानं आपल्या खिलाफतची घोषणा केली होती. दरम्यान, मस्जिद उडवल्याची माहिती इराकी सैन्यानं दिली. 
दरम्यान, इसिसनं असा दावा केला आहे की, ही मस्जिद अमेरिकेच्या एका लढाऊ विमानाच्या हल्ल्यात नष्ट झाली. तर दुसरीकडे अमेरिकेनं हा दावा फेटाळून लावला आहे.
 
काय आहे अल-नूरी मस्जिदचे वैशिष्ट्य ?
- इसिस आणि त्याविरोधात लढणारे पक्ष  यासाठी मस्जिदचे विशेष असे महत्त्व आहे 
- इसिस नेता अबू बकल अल बगदादीनं जुलै 2014 मध्ये येथे एक सभा घेऊन नवीन इस्लामिक राज्य स्थापित करण्याची घोषणा केली होती
- या घोषणेच्या आठ आठवड्यांनंतर मोसुल शहरावर इसिसनं कब्जा केला होता
- 1172 मध्ये मोसुल आणि अलेपोवर शासन करणारा नूर अल दीन महमूद जांगीनं ही मस्जिद निर्माण करण्यासाठी आदेश दिला होता. 
- नूर अल दीन महमूद जांगीच्या नावावरुनच मस्जिदचे नाव ठेवण्यात आले होते
 
"इसिसनं पराभव स्वीकारला आहे"
इराकचे पंतप्रधान हैदर अल अबादी यांनी सांगितले की, मस्जिद उडवणे म्हणजे इसिसनं पराभव स्वीकारल्याची अधिकृत घोषणा आहे. तर इराकी सैन्यानं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकारत असे नमूद करण्यात आले आहे की, मस्जिद पूर्णतः उद्धवस्त झाली आहे. इसिसनं या पूर्वी इराक आणि सीरियामधील अनेक महत्त्वपूर्ण स्थळं उद्धवस्त केली आहेत. 
 
अमेरिकी सैन्याच्या नेतृत्वात मोसुलमध्ये इसिसविरोधात चार दिवसांपासून लढाई सुरू आहे. चौथ्या दिवशी मोसुलमधील दोन प्रसिद्ध मस्जिद उद्धवस्त करण्यात आल्या. तीन वर्षापूर्वी बगदादीनं आपल्या खिलाफतची घोषणा केली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत जिहादी संघटनांनी इराक आणि सीरियामध्ये मोठ्या प्रमाणात धार्मिक स्थळं आणि स्मारकं  उद्धवस्त केली आहेत.
 
इसिसनं नूरी मस्जिदसोबत अल हब्दा नावाची आणखी एक इमारतही उडवली. ही इमारत नूरी मस्जिदच्या समोर होती. मोसुलमधील ही सर्वात लोकप्रिय इमारत होती. इसिसनं यापूर्वीही ही इमारत उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता.