शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीचा FB वर खोटा मेसेज, 11 वर्षाच्या प्रियकराची आत्महत्या

By admin | Updated: April 8, 2017 15:04 IST

प्रेम म्हणजे मजा नसते आणि त्यातही जर एखाद्या लहानग्याच्या मनासोबत खेळलं तर ते जीवघेणं ठरू शकतं.

ऑनलाइन लोकमत
डेट्रॉइट , दि. 8 - प्रेम म्हणजे मजा नसते आणि त्यातही जर एखाद्या लहानग्याच्या मनासोबत खेळलं तर ते जीवघेणं ठरू शकतं. अमेरिकेच्या मिशिगन प्रांतात अशीच एक घटना समोर आली आहे. 
 
येथील डेट्रॉइट शहरातील 11 वर्षाच्या मुलाने फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. टायसन बेन्झ असं त्याचं नाव. बेन्झ याने आत्महत्या करण्यापूर्वी त्याच्या गर्लफ्रेंडने "आपण आत्महत्या करत असल्याचा एक खोटा मेसेज सोशल नेटवर्कींग वेबसाइट फेसबुकवर  पोस्ट केला होता. खरंतर मजा म्हणून तिने हा मेसेज पोस्ट केला होता, यामध्ये तिचे मित्रही सहभागी होते. पण तिच्या या मजा म्हणून केलेल्या मेसेजमुळे टायसनचा नाहक जीव गेला.    
 
गर्लफ्रेंडचा फेसबुकवरील मेसेज पाहून टायसन गोंधळला, काय करावं त्याला सुचत नव्हतं, तिच्या मेसेजला उत्तर म्हणून आपणही आत्महत्या करत असल्याचा मेसेज त्याने टाकला. त्यानंतर त्याने स्वतःच्या घरात फाशी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. टायसनच्या आईने दरवाजा उघडला असता त्यांना टायसन लटकलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी तात्काळ त्याला स्थानिक रूग्णालयात नेलं, अखेर मंगळवारी (दि.4)डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केलं. 
 
या घटनेनंतर टायसनच्या कुटुंबाकडून त्याच्या आठवणीत GoFundMe नावाचं वेब पेज बनवलं आहे. सोशल मीडिवरील खोट्या मेसेजबाबत जागरूकता निर्माण करणं हा त्यामागचा उद्देश आहे.
 
सोशल मीडियाद्वारे एखाद्याचा छळ करण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे.  सोशल मीडियाचा वापर करताना खबरदारी घेणं आवश्यक आहे, सर्वांनी जबाबदार होणं गरजेचं आहे, असं टायसनची आई कॅटरीना गॉस म्हणाल्या. याबाबतीत शाळांनी जबाबदारी घेऊन मुलांना योग्य शिक्षण देण्याची गरज असल्याचं त्या म्हणाल्या.