शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

३ कोटी युजर्सची गोपनीय माहिती उघड

By admin | Updated: August 20, 2015 23:11 IST

सुरक्षा भेदत हॅकर्सनी अ‍ॅश्ले मॅडिसन या वेबसाईटवर हल्ला चढवीत ३.७ कोटी युजर्सची नावे, पत्ते, ई-मेल, वय आणि फोन नंबरसह इत्थंभूत गोपनीय माहिती इंटरनेटवर

लंडन : सुरक्षा भेदत हॅकर्सनी अ‍ॅश्ले मॅडिसन या वेबसाईटवर हल्ला चढवीत ३.७ कोटी युजर्सची नावे, पत्ते, ई-मेल, वय आणि फोन नंबरसह इत्थंभूत गोपनीय माहिती इंटरनेटवर जारी केल्याने खळबळ उडाली आहे. हॅकर्सच्या या सायबर हल्ल्यामुळे पुन्हा एकदा सायबर सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.अ‍ॅश्ले मॅडिसन वेबसाईटची टॅगलाईन ‘लाईफ इज शॉट, हॅव अ‍ॅन अफेअर’ आहे. ही वेबसाईट सर्रास नातेसंबंधातील विश्वासाला तिलांजली देत स्वैराचारासाठी जोडीदार शोधण्यास मदत करते. हॅकर्सनेही ही सर्व गोपनीय माहिती डार्क वेबवर टाकली आहे. टॉर ब्राऊझरवर ही माहिती पाहता येते. अमेरिकेची फेडरल ब्युरो आॅफ इन्व्हीस्टेशन ही संस्था या प्रकरणी चौकशीला लागली आहे. अ‍ॅश्ले मॅडिसन डॉट कॉमच्या सदस्यांची गोपनीय माहिती उघड करणारे हे गुन्हेगारी आणि बेकायदेशीर कृत्य आहे, असे अ‍ॅव्हिड लाईफ मीडियाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले. या कृत्यामागील लोक स्वत:ला नैतिकतेचे रक्षक समजून स्वत:ची मते लादू पाहत आहेत, असेही अ‍ॅव्हिड लाईफ मीडियाने म्हटले आहे. २००१ मध्ये कॅनडाचे नोएल बिडरमन यांनी ही वेबसाईट सुरू केली. मालकी टोरोन्टोतील अ‍ॅव्हिड लाईफ मीडियाची आहे. या प्रकरणी आम्ही कॅनडा आणि अमेरिकेतील पोलीस आणि कायदा अंमल प्रशासनाच्या संपर्कात आहोत, असे अ‍ॅव्हिड लाईफ मीडियाने निवेदनात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)