शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ड्रोनच्या साह्याने परागण करण्याचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2017 00:24 IST

जपानच्या शास्त्रज्ञांनी किड्याच्या आकाराचे, घोड्याच्या केसाने आच्छादलेले व चिकट द्रव (जेल) असलेले ड्रोन विकसित केले आहे.

टोक्यो : जपानच्या शास्त्रज्ञांनी किड्याच्या आकाराचे, घोड्याच्या केसाने आच्छादलेले व चिकट द्रव (जेल) असलेले ड्रोन विकसित केले आहे. भविष्यात या ड्रोनच्या साह्याने पिकांचे परागण (पोलिनेशन) करण्यास मदत होईल. मधमाशांची जगभरच जी संख्या घटत जात आहे, ती यामुळे रोखता येईल. या कृत्रिम परागणकर्त्याच्या (पोलिनेटर्स) खालचा भाग हा घोड्याच्या केसाने आणि चिकट अशा जेलने आच्छादलेला असतो. त्यामुळे एका फुलातील परागकण घेऊन ते दुसऱ्या फुलावर टाकता येतात. आमच्या नव्या शोधामुळे आधुनिक शेतीपद्धतीने मधमाशांच्या वसाहतींवर पडलेले ओझे कमी होईल व त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल, अशी या संशोधकांना आशा आहे. या संशोधनाचा वापर कृत्रिम परागणांना विकसित करण्यात होऊन मधमाशांच्या कमी होत असलेल्या संख्येचा प्रश्न सोडवण्यास होेईल. हे संशोधन शेतीमध्ये आणि यंत्रमानवात वापरले जाईल, असे जपानमधील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ अ‍ॅडव्हान्सड् इंडस्ट्रीयल सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे रसायनशास्त्रज्ञ एईजिरो मियाको यांनी सांगितले. रोबोटिक पोलिनेटर्सला (यंत्रमानवाच्यासाह्याने परागण) परागण कसे करतात याचे प्रशिक्षण ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीमद्वारे दिले जाऊ शकेल, असा आम्हाला विश्वास असल्याचे मियाको म्हणाले.२००७ मध्ये मियाको हे इलेक्ट्रिकल कंडक्टर्स म्हणून वापरता येतील असा द्रवपदार्थ तयार करण्यात गुंतलेले होते. या त्यांच्या प्रयत्नांतून मानवी केसांना लावायचे मेणासारखा चिकट जेल तयार झाला. आपला प्रयत्न फसला असा त्यांचा समज होता. मधमाशांची कमी होणारी संख्या आणि रोबोटिक इन्सेक्ट्सबद्दलच्या बातम्या वाचून मियाको यांनी घरोघर दिसणाऱ्या माशा आणि मुंग्या यांचा वापर करून जेलचा वापर हा परागकण वेचण्यासाठी होऊ शकतो का याचा शोध सुरू केला.